ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी कृषी प्रदर्शने उपयुक्त : श्रीपाद नाईक

शेतकरी

 नाशिक शहरात सुरू असणाऱ्या नवव्या जागतिक कृषी महोत्सवाला सोमवार (ता.२७) केंद्रीय आयुष तथा संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी भेट दिली. यावेळी ते म्हणाले, कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकरी हे सेंद्रिय शेतीकडे मोठ्या प्रमाणात वळत आहे. ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी कृषी प्रदर्शने हे खूप उपयुक्त आहेत. पण त्यासाठी शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध व्हायला हवे.

रासायनिक शेतीमुळे आरोग्याचे नुकसान झाले आहे. सेंद्रिय शेतीमध्ये कमी खर्चात जास्त उत्पन्न घेता येते आणि त्याचा एक फायदा म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला चांगली किंमत मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणानुसार शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत वाढले पाहिजे, यासाठी हे कृषी प्रदर्शने हे माध्यम प्रभावी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आयुष तथा संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणानुसार अनेक योजना ह्या शेतकऱ्यांना बळ देत आहेत, असे नाईक म्हणाले. यावेळी प्रदर्शनाचे आयोजक आबासाहेब मोरे यांच्या हस्ते नाईक यांचा सन्मान करण्यात आला. सन्मान झाल्यानंतर त्यांनी कृषी महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या विविध संस्थांच्या स्टॉलला भेटी देत माहिती घेतली.

महत्वाच्या बातम्या –

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले सुषमा स्वराज यांचे अंत्यदर्शन

भाजपाचे नेते इमानदार म्हणत असतील तर सर्वांची चौकशी झाली पाहिजे

केंद्र सरकारने खरीप पिकांच्या किंमतीमध्ये वाढ केल्यामुळे शेतकर्‍यांना मिळाला दिलासा