VIDEO : फुंडकर साहेब मर्द असाल तर या मैदानात-बच्चू कडू

शेगाव: आमदार बच्चू कडू यांनी राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना चांगलच फैलावर घेतल आहे. पांडुरंग फुंडकर यांनी सुकाणू समितीच्या नेत्यांना देशद्रोही म्हंटल्यानंतर बच्चू कडू यांनी कृषिमंत्र्यांना राजीनामा देऊन या आपण दोघे सीमेवर जाऊन आपली देशभक्ती सिध्द करू अस म्हणत खूल आव्हान दिल आहे.

फुंडकरांच्या अंगात सत्ता भिनली असल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्यावर प्रतिहल्ला चढवताना केला. दरम्यान , भंगारमध्ये जमा झालेले सर्व नेते एकत्र येऊन सुकाणू समिती तयार करण्यात आली, अशा शब्दांत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सुकाणू समितिवर ताशेरे ओढले होते. त्यावर आमदार बच्चू कडू यांनी हा हल्ला चढविला.

शनिवारी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी भाजपा किसान आघाडीच्या शेतकरी मेळाव्यात चिखली येथे सुकाणू समितीचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की आंदोलनवेळी सुकाणू समितिने शेतकऱ्यांचा माल रस्त्यावर टाकला त्यामुळे त्याची एकप्रकारे लुटच करण्यात आली. तर स्वतंत्र्य दिनी पालकमंत्र्यांना ध्वजारोहणपासून रोखणे हा देशद्रोहाचा गुन्हाच आहे. कायदा का यांच्या घरचा आहे का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला होता .
बच्चू यांनी आपल्या स्टाईल मध्ये पांडुरंग फुंडकर यांना उत्तर दिले आहे . पहा हा व्हिडीओ