कृषिमंत्री येतात विमानातून उतरतात आणि बुलढाण्याला निघून जातात !

औरंगाबाद: कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मागील एक वर्षांपासून मराठवाडा पहिलाच नाही. मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात बोंडअळीने शेतकरी अक्षरशः हातघाईला आला आहे. बोंडआळी ग्रस्त शेतकऱ्यांना नुसतीच मदत जाहीर करण्यात आली असून अद्याप पर्यंत पंचनामे सुद्धा पूर्ण झालेले नाहीत त्यातच कृषिमंत्री फुंडकर यांची सुद्धा मराठवाड्यावर कृपादृष्टी नसल्याचे जाणवते आहे. फुंडकर मागील एक वर्षांपासून केवळ औरंगाबादच्या विमानतळावर उतरताना दिसले आहेत.

पण कधी शेतकऱ्यांच्या बांधावर किंवा त्यांनी विशेष असा एखादा दौरा सुद्धा आखलेला नाही ज्यामधून शेतकऱ्यांच्या समस्या समस्येवर उपाय योजना करता येतील. ते येतात विमानातून उतरतात आणि बुलढाण्याला निघून जातात. याउलट मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठवाड्यातील जलयुक्त शिवार सारख्या योजनांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन भेटी दिल्या आहेत.

मागच्या वर्षभरात मंत्र्यांच्या मराठवाड्याला भेटी

1) गुलाबराव पाटील ( राज्यमंत्री )

2) सुभाष देशमुख (सहकारमंत्री)

3) गिरीश महाजन ( जलसंपदा मंत्री )

4) सुधीर मुनगंटीवार ( अर्थ मंत्री )

5) जयकुमार रावल (रोजगार हमी योजना)

6) प्रकाश मेहता ( गृह निर्माण मंत्री)

7) संभाजी पाटील निलंगेकर (कौशल्य विकास मंत्री)

8) चंद्रशेखर बावनकुळे ( उर्जा मंत्री )

9) पंकजा मुंडे ( महिला व ग्रामविकास मंत्री )

10) रामदास कदम ( पर्यावरण मंत्री )

मागील एका वर्षात ह्या मंत्र्यांनी मराठवाड्याला भेटी दिल्या आहेत मात्र फुंडकर यांची शेवटची भेट ही 4 ऑक्टोबर 2016 ला होती तीही औरंगाबाद शहरातच. याबाबत एका जिम्मेदार कृषी अधिकाऱ्याने माहिती दिली आहे