कृषी कर्मचाऱ्यांना उद्या दिवसभर बँकेत थांबण्याचे आदेश

वेबटीम: सध्या राज्यभरात प्रधानमंत्री पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केल्याच दिसून येत आहे. पीकविमा भरण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्याने बँकेत शेतकऱ्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतकऱ्यांची अडचण होवू नये यासाठी कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उद्या दिवसभर बँकेत थांबण्याचे आदेश कृषी आयुक्तांनी दिले आहेत.

तसेच सगळ्या शेतकऱ्यांचा पीकविमा उतरवला जावा यासाठी बँकेत जास्तीत जास्त काऊंटर सुरु करण्याचे आवाहन हि कृषी आयुक्तांनी केल आहे. दरम्यान अजूनही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा पीकविमा भरायचा राहिला असल्याने केंद्र सरकारकडे 15 दिवसांची मुदत वाढवून मिळण्यासाठी राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.