कृषी विकास क्षेत्रात महाराष्ट्राला सहकार्य करण्यास तयार – अर्जेन्टिनाचे राष्ट्राध्यक्ष मोरिसिओ मॅक्री

भारतासोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्याला 70 वर्षे पूर्ण होत असताना महाराष्ट्राला भेट दिल्याबद्दल राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी मॅक्री यांचे आभार मानले. अर्जेन्टिनाचे कृषी विकासात सहकार्य लाभल्यास भारताला शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास निश्चितपणे मदत होईलअसे राज्यपालांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात सुरु असलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पकोस्टल रोड व इतर पायाभूत प्रकल्पांबाबत अर्जेन्टिनाच्या शिष्टमंडळाला माहिती दिली.