राज्यात दुबारपेरणीचे संकट येऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले!

कृषीमंत्री

पाऊस आला रे…. म्हणत आज एक आठवडा पूर्ण झाला असून मॉन्सून महाराष्ट्रात आणखीन दाखल झालेला नाहीये, शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे(Agriculture Minister Dadaji Bhuse) यांनी केले.

कृषिमंत्री दादाजी भुसे म्हणाले ४० ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय कोणीही आपल्या शेतात पेरणी करू नये. जून चा पहिला आठवडा संपला असून आजून देखील पाऊस झालेला नाहीये व राज्यातील शेतकरी संभ्रमात आहे, कि पेरणी करावी कि नाही पाऊस न झाल्यास तुम्ही पेरणी केली तर आर्थिक फटका बसणार आहे तसेच बियाणे खराब होण्याची संभावना असेल.

हवामान खात्याने लवकर पाऊस येईल असा अंदाज वर्तवला होता परंतु वातावरण बदलांमुळे मॉन्सून केरळात अडकला आहे तरी मॉन्सून येण्यासाठी आणखीन ४ ते ५ दिवस लागण्याची शक्यता असून मॉन्सून १५ जून पर्यंत राज्यात येईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

महत्वाच्या बातम्या –