कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. शरद पवार यांचा कृषी क्षेत्राचा अभ्यास आणि त्यांचे योगदान पाहता राज्यातील कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल, असे भुसे यांनी सांगितले.
रोहित पवार यांनी एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलला
सकाळी भुसे यांनी पवार यांच्या येथील निवासस्थानी भेट घेतली. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ग्रामीण भागाचे अधिकाधिक दौरे केले पाहिजे. कृषी विद्यापीठांची महत्त्वपूर्ण भूमिका लक्षात घेऊन शेतीच्या विकासासाठी त्याचा योग्य तो वापर करणे, कृषी क्षेत्रात ज्या संस्थांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांच्या भेटी घेणे, आदी बाबी श्री.पवार यांनी भुसे यांना सांगितल्या.
सातत्याने बदलत्या वातारणामुळे बेदणा काळा पडण्यास प्रारंभ
दरम्यान, शरद पवार यांनी केंद्र कृषिमंत्री पद भूषवले असून शेती क्षेत्रात त्यांचा असलेला हातखंडा शेतकऱ्यांना सध्याच्या असलेल्या हलकीच्या परिस्थितून काढण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरू शकतो. त्यामुळे या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाल आहे.
पीक विमा योजना राबविण्यासाठी सरकारने केली आवश्यक उपाययोजना https://t.co/Q3q3sGaKNZ
— Krushi Nama (@krushinama) January 16, 2020