Video: कृषीमंत्री फुंडकरांच्या गाडीवर फेकले कापसाचे झाड

नागपूर- कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना आज, शुक्रवारी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यसंतापाला सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांची कैफीयत न ऐकताच कृषीमंत्री गाडीत बसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी त्यांच्या ताफयातील गाडीवर कापसाचे झाड फेकले.

किटकनाशकांची फवारणी करताना यवतमाळ जिल्ह्यातील 23 शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आज कृषीमंत्री फुंडकर यवतमाळ दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी घाटंजी तालुक्‍यातील माणोली गावात भेट दिली. त्यांनी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी समस्या सांगण्यास सुरूवात केली. यावेळी कृषीमंत्री शेतकऱ्यांची कोणतीही बाजू न ऐकताच गाडीत बसले व तेथून निघून गेले. कृषीमंत्र्यांसमोर पालकमंत्री मदन येरावारही उपस्थित होते. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शेतातून उपटून आणलेले कापसाचे झाड मंत्र्यांच्या गाडीवर फेकले. मंत्र्यांनी कोणतीही बाजू ऐकून न घेतल्याने शेतकरी संतप्त झाले होते. शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीचे कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते.

Loading...

दरम्यान मंत्र्यांच्या गाडीवर कापसाचे बोंड फेकणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व काही वेळाने सोडून दिले.

Add Comment

Click here to post a comment
Loading…