जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने लावली जोरदार हजेरी

पाऊस

बीड –  राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सगळीकडे ढगाळ वातावरण आहे. तर राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरीही लावली आहे. त्यात बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बीड जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. शनिवारी पहाटे झालेल्या जोरदार पावसाने बीड जिल्ह्यातील वाण नदी खळाळून वाहू लागली आहे. तर इतर छोट्या नद्या व नालेही भरून वाहू लागले आहे. याच तालुक्यातून वाहणाऱ्या रेणा नदीला पुर आला.

बीड जिल्ह्यात पहिल्याच पावसात रेणा नदीच्या पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. यामुळे जोगाईवाडी तलावाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झालीआहे. तर जिल्ह्यातील अंबाजोगाई शहराला काही प्रमाणात पाणीपुरवठा होणाऱ्या काळवटी तलावाच्या पाणीसाठ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

महत्वाच्या बातम्या –