अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी

अतिवृष्टी पिकांचे नुकसान

वाशीम – राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकरी हा पिकांसाठी बँकेतून कर्ज घेतो. त्यानंतर तो मेहनतीने त्याची लागवड करतो. हे सर्व कष्ट करून देखील त्याला अश्या संकटाना सामोरे जावे लागते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गुळाचा चहा पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

तसेच त्यामध्ये शेतकऱ्यांचे सोयाबीन, तूर, कापूस आणि भाजीपाला अश्या अनेक पिकांचे नुकसानझाले आहे.या सर्व पिकांचे पंचनामे लवकरात लवकर करावे व त्यांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक व युवती कॉंगेसने तहसीलदारांमार्फत शासनाकडे केली.

चिंच खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

या निवेदनात म्हटले आहे की, सोयाबीन पिकाचा उत्पादक म्हणून वाशीम जिल्हा समजला जातो. तसेच जिल्ह्यात सोयाबीनला पर्यायी पीक म्हणून तूर, कापूस पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढला. मात्र, काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीन पिके पिवळे पडले व त्याने सर्व पिकांचे नुकसान केले आहे. या पिकांचे पंचनामे शासनाने त्वरित करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी. संजय गांधी निराधार योजने अंतर्गत विधवा, अपंग वयोवृद्ध कलावंतांचे रखडलेले मानधन त्यांना त्वरित द्यावे, कोव्हिड १९ च्या कार्यकाळामध्ये बेरोजगार व अल्पभूधारक, परित्यक्ता महिलांना रेशन विनामूल्य द्यावे. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, आदी मागण्या करण्यात आल्या.

महत्वाच्या बातम्या –

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत प्रशासनाने अधिक सतर्क राहून मदत कार्य करावे – उद्धव ठाकरे

‘ही’ भाजी खाणे आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरते, जाणून घ्या फायदे

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस