कागदी लिंबू लागवड

लिंबू लागवडीसाठी जास्त चुनखडी, क्षार नसणारी जमीन योग्य असते. भारी, पाणथळ, चोपण तसेच खडकाळ जमिनीत लागवड करू नये. लागवडीसाठी साई शरबती आणि फुले शरबती या जातींची निवड करावी. दीर्घकाळ दर्जेदार फळांचे उत्पादन मिळण्यासाठी झाडांचा सांगाडा व खोड मजबूत होणे आवश्यक आहे. लिंबू हे बहुवर्षीय फळझाड असल्यामुळे लागवडीसाठी मध्यम काळी, हलकी, मुरमाड, पाण्याचा निचरा होणारी जमीन … Read more

इजिप्तचा कांदा मुंबई एपीएमसीत पुष्पा ट्रेडिंग कंपनीकडे दाखल

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पिकांच अतोनात नुकसान झाल आहे. अशात जे काही थोडे फार पिकं वाचलेत त्यांना आता चांगले बाजारभाव मिळण्याचे चित्र दिसत असतानाच सरकारने शेतकऱ्यांच्या या थोड्याफार आनंदावर विरजण फेरलं आहे. परतीच्या पावसामुळे नाशिक, पुणे आणि नगर जिल्ह्यातील कांद्याचे भाव प्रती किलो 60 ते 65 रूपये किलो झाल्याने गुरूवारी 14 नोव्हेंबर रोजी … Read more

कारली पिकासाठी जाणून घ्या अनुकूल हवामान

कारली आणि दोडकी या दोन्ही पिकांची पावसाळी व उन्हाळी हंगामात लागवड करतात. कारल्यास उष्ण व दमट हवामान तर दोडक्यास समशितोष्ण व दमट हवामान मानवते. दोडका थोडीशी थंडी सहन करु शकतो. मात्र कार्लाच्या वेलीवर थंडीचा परिणाम होतो. भुसभूशीत चांगला निचरा असणारी भारी ते मध्यम जमनीत लागवड करावी. चोपण अथवा चिबड जमिनीत ही पिके घेऊ नयेत.जमीनीची उभी … Read more

कोथिंबीर १८ हजार रुपये शेकडा बाजारभावाने विक्री

परतीच्या पावसाचा फटका बसल्यामुळे पिकांचे खूप नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाचा फटका हा सर्व प्रकारच्या शेतमालावर जाणवला आहे. परतीच्या पावसाने शेतातील उभे पीक नाश पावल्याने पालेभाज्या आवक घटली आहे. आवक घटल्यामुळे बाजारभाव टिकून आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक वाढल्याने पालेभाज्या दर टिकून आहे. पालेभाज्या दर टिकून असल्याने सर्वसामान्य नागरिकांना दोन वेळच्या जेवणात … Read more

धक्कादायक बातमी ! कांदा पिकाचे पंचनाम्यांचे आदेश नाहीत

खरीप कांद्याची लागवड ही जुलै व ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच होत असते. पण नाशिक जिल्ह्यात जुलैच्या अखेरीस पावसामुले खरीप हंगामातील लाल कांद्याच्या लागवडी ह्या लांबणीवर गेल्या. सुरुवातीला अतिपाऊस झाल्याने अनेक लागवडी व टाकलेली रोपे खराब झाली. लागवडी लांबणीवर गेल्याने कांदा काढणी हंगाम सुद्धा लांबणीवर जाणार हे माहित असताना देखील पावसाने कांदा पीक धोक्यात आले आहे. पण … Read more

आता केंद्र सरकार इजिप्त, तुर्कस्तानमधून १ लाख मेट्रिक टन कांदा करणार आयात

पावसाचा आणि पुराचा फटका कांद्याला बसल्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे, कांद्याचा साठा कमी झाल्यामुळे किरकोळ बाजारात भाव गगनाला भिडत असल्याने केंद्र सरकारने एमएमटीसीला येत्या महिन्यासाठी तातडीने १ लाख मेट्रिक टन कांद्याची आवक करण्याचे आदेश दिले आहेत. इजिप्त, तसेच तुर्कस्तानमधून हा कांदा आयात केला जाणार असून, त्याच्या देशांतर्गत वितरणाची जबाबदारी नाफेडवर सोपविण्यात आली आहे. देशातील … Read more

कांद्याच्या वाढत्या किमतीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने घेतला हा निर्णय

कांद्याच्या वाढत्या किमतीला आळा घालण्यासाठी 1 लाख टन कांदा आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. आयात कांदा देशभरात पोचवण्याच्या सूचना नाफेडला देण्यात आल्याचं अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री राम विलास पासवान यांनी काल सांगितलं. दरम्यान, महाराष्ट्र आणि कर्नाटकात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र नेमकी कांद्याची काढणी सुरू असताना दोन्ही राज्यात जोरदार पाऊस … Read more

पावसामुळे फळभाज्या आणि पालेभाज्या खराब झाल्याने भाज्यांचे दर गगणाला भिडले

मागील काही दिवसांपासून सातत्याने कोसळणार्‍या पावसामुळे सर्वाधिक नुकसान भाज्यांचे झाले आहे. जाग्यावरच फळभाज्या आणि पालेभाज्या खराब झाल्याने बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी मागणी अधिक आणि आवक कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने भाज्यांचे दर गगणाला भिडले आहेत. वाटाणा, शेंवग्याचा किलोचा दर 150 रूपये, तर तोंडली, गवारच्या दराने 120 रूपयाचा आकडा गाठला आहे. त्यामुळेच भाज्याच्या … Read more

अजून महिनाभर राहणार कांद्याचे दर तेजीत

परतीच्या पावसाचा कालावधी लांबल्याने नव्या कांद्याचे नुकसान झाले आहे. कांदा जमिनीतच सडत असल्याने महिनाअखरेरपर्यंत नवीन कांद्याची आवक अशक्य आहे. त्यामुळेच आणखी महिनाभर कांद्याचे दर तेजीत राहणार आहेत. त्यानंतर मात्र काही प्रमाणात दर कमी होणार असल्याचा अंदाज व्यापारी रितेश पोमण यांनी व्यक्त केला. सद्य:स्थितीत जी आवक होत आहे. तो भिजलेला कांदा आहे. त्यामुळे त्याचा दर्जा खालावलेला … Read more

जाणून घ्या , ‘मेथी’ खाण्याचे हे आहेत फायदे…..

मेथी : (शास्त्रीय नाव: Trigonella foenum-graecum, ट्रिगोनेला फीनम-ग्रासम) ही लेग्युमिनोसी कुळातील वनस्पती आहे. ही पाने व बिया या दोन्ही रूपांत वापरली जाते. मेथीची पाने भाजी म्हणून वापरले जातात. तसेच, मेथीदाणे हे मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरले जातात. कसुरी मेथी नावाने प्रचलित असलेली वाळवलेली मेथीपाने त्यांच्या सुगंधामुळे विविध पदार्थांत वापरली जातात.मेथीला कडवट चव असते. जाणून घेऊयात काय … Read more