अहमदनगरमध्ये शेवग्याच्या दरांत सुधारणा

नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भाजीपाल्याची आवक- सातत्याने कमी जास्त होत आहे. टोमॅटोची २७० क्विंटलची आवक झाली. प्रतिक्विंटलला ५०० ते १२०० रुपयांचा दर मिळाला. वांग्यांची २८८ क्विंटलची आवक झाली. त्यांना ५०० ते १२०० रुपयांचा दर मिळाला.फ्लॉवरची ३३३ क्विंटलची आवक झाली आणि ५०० ते १२०० रुपयांचा दर मिळाला. कोबीची २९७ क्विंटलची आवक होऊन १००० ते २५०० … Read more

नाशिकमध्ये लसणाच्या आवकेत घट

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील सप्ताहाच्या तुलनेत लसणाच्या आवकेत घट झाली. दरांत वाढ झाली आहे. आवक ११२ क्विंटल झाली.त्यास प्रतिक्विंटल १५००० ते २२५०० असा दर मिळाला.  चालू सप्ताहामध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर घटल्याचे दिसून आले. आवक ७७८३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १५५० ते ५५०० दर मिळाला. आवक कमी झाल्याने बाजारभाव वाढल्याचे दिसून आले. चामखीळ घालवण्यासाठी … Read more

अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या तुरीच्या शेंगा काळवंडल्या

अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या तुरीच्या शेंगा काळवंडल्या आहेत. खरिपातील हे पीकही आता संकटात सापडले आहे. मागील आठ ते दहा दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. २२ वर्षाचे झाड अन उंची ३ फूट कडाक्याची थंडी, दाट धुके या धुक्यामुळे निर्माण होणारा ओलावा तर कधी रिमझिम पाऊस, अशा विचित्र वातावरणाचा फटका रब्बी पिकांसह तूर व हळदीलाही या … Read more

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा गहू पेरणीवर जोर

अनेक वर्षांच्या खंडानंतर यंदा गव्हाच्या पेरणीक्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्याने सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा पार केला आहे. सर्वसाधारण ३० हजार ४७६ हेक्टर क्षेत्र असताना ३२ हजार २०८ हेक्टरवरपेरणी झाली आहे. जिल्ह्यात मंगळवार  पर्यंत २ लाख ४७ हजार ५९६ हेक्टरवर रब्बी पेरणी झाली आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. उशीरा येणारे तूर पीक मातीमोल ! शेतकऱ्यांचे … Read more

हापूस आंबा यंदा एकाच वेळी बाजारपेठेत

साधारणतः जानेवारीमध्यापासून सुरू होणारा हापूस आंबा काढणी हंगाम यंदा एप्रिलमध्ये होणार आहे. उशिराच्या आगमनामुळे हापूस आंब्याचे बाजारपेठीय आणि निर्यातीचे गणित बदलणार असून, ऐन एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात बाजारपेठांमध्ये आवक होण्याचे संकेत आहेत. मात्र, यामुळे निर्यात वाढीचीही शक्यता असल्याने काही अंशी बागायतदारांना दिलासा मिळणार आहे.  यंदा मॉन्सूनचा दीर्घ मुक्काम, ऐन मोहोर लागण्याच्या अवस्थेत झालेला अवकाळी पाऊस, लांबलेली … Read more

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बटाटा, भेंडी, टोमॅटो आवक कमी

गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील थंडीच्या वाढलेल्या कडाक्याने विविध भाजीपाल्याचे उत्पादन तुलनेने घटल्याने आवक मंदावली आहे. परिणामी बटाटा, भेंडी, गवार, टोमॅटो, पावटा, सिमला मिरची आणि घेवड्याच्या दरात वाढ झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत गवार २००० ते ४००० रुपये … Read more

अहमदनगरमध्ये कांदा साडेपाच हजारांवर स्थिर

गेल्या दोन महिन्यांपासून वाढलेले कांद्याचे दर गेल्या आठवडाभरापासून बऱ्यापैकी खाली आले आहेत. सध्या नगरसह अन्य बाजार समित्यांत कांद्याचे दर ५०० रुपयांपासून सुरू होत असून, साडेपाच हजारांवर स्थिर आहेत. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवार, गुरुवार आणि शनिवार असे तीन दिवस लिलाव होत असतात. नगर जिल्ह्यामधील बहुतांश बाजार समितीत गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याचे दर कमालीचे वाढले … Read more

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात द्राक्ष हंगामाला गती येईल

आटपाडी आणि मिरज पूर्व भागात द्राक्षे काढणीला आली आहेत. जिल्ह्यात केवळ पाच टक्के हंगाम सुरू आहे. द्राक्ष खरेदीसाठी व्यापारी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. परंतु, मॉन्सूनोत्तर पावसाने द्राक्षाचे नुकसान झाले असल्याने फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात द्राक्ष हंगामाला गती येईल. यंदा द्राक्षाला चांगले दर मिळतील, असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. सध्या आटपाडी आणि मिरज पूर्व भागात द्राक्ष … Read more

मध आणि मनुके आरोग्यास लाभदायक

बदलत्या वातावरणामुळे सर्वत्र साथीचे आजार पसरले आहेत. या आजारावर मनुके आणि मध अत्यंत उपयोगी ठरतात. मनुके आणि मध दोन्हींमधील आयरन, कॅल्शियमसारखे न्यूट्रिएंट्स अनेक आजारांचा मात करण्यास मदत करतात. ही सर्व पोषकतत्वे शरीरास आवश्यक असतात. रात्रभर मनुके भिजवून सकाळी ते मधात मिक्स करुन खाल्ल्यास शरीरासाठी अनेक फायदे होतात. अधिक त्रास होत असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक … Read more

जाणून घ्या अंजीर खाण्याचे फायदे….

अंजीरमध्ये आर्द्रता, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद, कार्बोहायड्रेट, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, तंतुमय पदार्थ, ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असतात. अंजीर हा सुकामेव्यातील एक पदार्थ आहे. ओलं फळ किंवा सुकवलेले अंजीर हे दोन्ही आरोग्याला फायदेशीर ठरते. अंजीर पाण्यात भिजवून खाल्याने अनेक आरोग्याच्या समस्या कमी करण्यास मदत होते. नियमित १० दिवस  भिजवलेले अंजीर खाल्ल्याने अनेक समस्या दूर … Read more