अहमदनगर जिल्हा ठरतोय ‘कांदा’ लागवडीत अग्रेसर !

अहमदनगर

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात यंदाही कांदा लागवडीला शेतकऱयांनी सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. ह्यावर्षीपर्यंत सुमारे एक लाख 51 हजार 273 हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड करण्यात आली आहे.नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात सर्वाधिक 29 हजार 710 हेक्टर क्षेत्रावर लागवड(Planting) झाली आहे.मागील वर्षे पाहता नगर जिल्ह्यातील ही विक्रमी लागवड(Record planting) आहे.

यंदा पाण्याची उपलब्धता(Availability) चांगल्याप्रकारे असल्याने आतापर्यंत कांद्याची एक लाख 51 हजार 273 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली असून, हा आकडा पावणेदोन लाखाच्या जवळपास जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पारनेरसह अन्य तालुक्यांत यंदा कांदा लागवड अधिक आहे. जिल्ह्यात अलीकडे कांद्याची सर्वाधिक लागवड(Most planted) आहे.

तालुकास्थरावरील कांदा लागवड (हेक्टरमध्ये) -(Onion Cultivation at Taluka level (in hectare) –
नगर – 25,821
पारनेर – 29,710
श्रीगोंदा – 11,141
कर्जत – 17,186
जामखेड – 2410
शेवगाव – 3859
पाथर्डी – 11,652
नेवासा – 8458
राहुरी – 9761
संगमनेर – 8,169
अकोले – 509
कोपरगाव – 10,354
श्रीरामपूर – 9107
राहाता – 3136

अहमदनगर जिल्ह्यात(Ahmednagar district) साधारण सात ते आठ वर्षांपासून कांद्याचे मोठे उत्पादन शेतकरी घेत आहेत. गेल्या दोन वर्षांत अतिपाऊस, रोगाचा प्रादुर्भाव, दरात चढ-उतार आणि कोरोना अशा अनेक संकटांतून कांद्याचे नुकसान झाले होते. तरीही नगदी पीक(Cash crop) म्हणून अलीकडच्या काळात कांदा उत्पादनाला नगर जिल्ह्यात प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. मात्र, यंदा काही महिन्यांपासून कांद्याचे दर(Onion prices) अडीच ते तीन हजारांवर स्थिर आहे.

 

बियाणे खरेदी करताना घ्या काळजी !(Be careful when buying seeds!)
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात बियाण्यांत फसवणुकीचे अनेक प्रकार घडले आहेत . ह्यावर्षी हि वाटाणा, सोयाबीन, कांद्याच्या बियाण्यांत फसवणूक झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत . कर्जतमध्ये डाळिंबावर फवारणी केल्या जाणाऱया कीटकनाशकात फसवणूक झाली. त्याचा आर्थिक फटका शेतकऱयांना सोसावा लागल आहे.

महत्वाच्या बातम्या –