AIDS/HIV | तीन वर्षांपासून HIV प्रतिबंध आणि उपचारात कोणतीही प्रगती नाही – Unicef

AIDS/HIV | तीन वर्षांपासून HIV प्रतिबंध आणि उपचारात कोणतीही प्रगती नाही - Unicef

टीम महाराष्ट्र देशा: 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन (World AIDS Day) साजरा केला जाणार आहे. तत्पूर्वी युनिसेफने इशारा दिला आहे की, बालक, किशोरवयीन मुले आणि गर्भवती महिलांसाठी AIDS/HIV उपचार आणि प्रतिबंधांमध्ये गेल्या तीन वर्षात कोणतीही प्रगती झालेली नाही. युनिसेफने जारी केलेल्या रिपोर्टनुसार, 2021 मध्ये सुमारे 1 लाख 10 हजार बालक आणि किशोरवयीन (0-19 वयवर्ष) एड्स संबंधित कारणामुळे मरण पावले आहेत. तर 3 लाख 10 हजार नवीन संक्रमित झाले आहे. त्याचबरोबर एचआयव्हीग्रस्त तरुणांची संख्या आता 2.6 दशलक्षावर पोहोचली आहे.

तीन वर्षांपासून AIDS/HIV प्रतिबंध आणि उपचारात कोणतीही प्रगती नाही

युनिसेफच्या एचआयव्ही सहाय्यक प्रमुख म्हणाल्या की, “एचआयव्ही/एड्स प्रतिबंध थांबवण्यात आल्यामुळे तीन वर्षापासून अनेक तरुणांची जीव धोक्यात आले आहे. त्याचबरोबर लहान मुले देखील याचे बळी ठरत आहे. कारण आपण अनेक शोध आणि चाचणीनंतर उपचार करण्यात अयशस्वी ठरत आहोत. दररोज सुमारे 300 पेक्षा अधिक बालक आणि किशोरवयीन मुलं एड्स विरुद्ध झुंज देत आहे. 2021 मध्ये एड्समुळे १७ टक्के बालक आणि 21 टक्के किशोरवयीन मुलांचा मृत्यू आणि संक्रमण झाले आहे.”

युनिसेफने इशारा दिला आहे की, जोपर्यंत असमानतेचे घटक संबोधित केले जात नाही, तोपर्यंत बालक आणि किशोरवयीन मुलांमध्ये एड्स थांबवणे दूरचे स्वप्न आहे. 2010 ते 2021 पर्यंत लहान मुलांमध्ये (0-14 वयवर्ष) नवीन एचआयव्ही होण्याचा संसर्ग 22 टक्क्यांनी कमी झाला असून, किशोरवयीन मुलांमध्ये (15-18 वयवर्ष) नवीन संसर्ग 40 टक्क्यांनी कमी झाला आहे. अशा परिस्थितीत एचआयव्हीग्रस्त मुलांची एकूण संख्या कमी होत असताना, मुले आणि प्रौढांमधील उपचारांची दरी वाढत चालली आहे.

2020 मध्ये युनिसेफ एचआयव्ही प्राधान्य देशांमधील मुलांसाठी एआरटी (ART) कव्हरेज 56% होते. तर 2021 मध्ये ते 54 टक्क्यांनी घसरले आहे. ही घसरण covid-19 महामारी आणि इतर जागतिक संकटांमुळे झाली आहे. ज्यामुळे उपेक्षितपणा आणि गरिबी वाढत चालली आहे.

महत्वाच्या बातम्या