सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवारांना क्लिन चीट

अजित पवार

१९९९ ते २००९ या काळात राज्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये ३५ हजार कोटी रुपयांची अनियमितता असल्याची बाब समोर आली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १२ डिसेंबर २०१४ रोजी सिंचन घोटाळ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत खुली चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. राज्यातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध कोणत्याही स्वरूपाची फौजदारी जबाबदारी निश्चित होत नसल्याचे स्पष्ट करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या शपथपत्रात अजित पवार यांच्याविरूद्ध कोणतीही फौजदारी कारवाई करता येणार नाही, असे स्पष्टपणे नमूद केले आहे.

तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांनी या सर्व मोठ्या आणि लघू प्रकल्पांना आणि त्यांच्या वाढीव खर्चाला त्यांनी ज्या प्रकारे घाईघाईने मंजुरी दिली, त्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले. जलसंपदामंत्री असताना अजित पवारांनी फक्त नऊ महिन्यांत तब्बल २० हजार कोटी रुपयांच्या वाढीव खर्चाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली. तसेच जुलै ते ऑगस्ट या तीन महिन्यांतच अजित पवार यांनी ३२ प्रकल्पांना मंजुरी मिळाली. हे प्रकल्प मंजूर करण्यासाठी व्हीआयडीसीच्या सुकाणू समितीचीही संमती घेण्यात आली नसल्याचा आरोप आहे. त्यासाठी चौकशीत सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांचा सहभाग आहे किंवा नाही, हे तपासण्यात आले.

तसेच हा तपस करण्यासाठी एक विशेष अशी तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने सर्व प्रकारच्या तांत्रिक बाबींचा अभ्यास केला. त्यानुसार सर्व निविदांचा अभ्यास करून ती माहिती मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्याची जबाबदारी व्हीआयडीसीचे कार्यकारी संचालक किंवा विभागाच्या सचिवांची होती. पण, त्यांनी तसे न करता ती माहिती जलसंपदामंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलेली नाही किंवा नकारात्मक शेराही मारलेला नाही. त्यामुळे सिंचन घोटाळ्यासंदर्भातील निविदा प्रक्रियांमध्ये मंत्र्यांकडून कंत्राटदारांना लाभ पोचविण्याची साखळी सिद्ध होत नाही.

महत्वाच्या बातम्या –

विधानसभा निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय पार्थ स्वत: घेईल – अजित पवार

सत्तेत असताना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी हे सरकार तर नौटंकी करीत आहे – अजित पवार

निवडणूकीसाठी शेतकऱ्यांना मोफत वीजेचे गाजर?

‘माणसं किड्या-मुंग्यांप्रमाणे मरत असतील तर ते सरकारचं अपयश आहे’ – अजित पवार