हे सरकार कसाई सारखं वागतं – अजित पवार

शेवगाव / रवी उगलमुगले : शेवगाव तालुक्यातील घोटण व खानापूर या गावांना आज अजित पवार यांनी भेट दिली विशेष म्हणजे अजित पवारांच्या या भेटीची कल्पना प्रशासनास दिली नव्हती. अजित पवार यांनी आंदोलनात जखमी झालेल्या शेतकऱ्यांची अहमदनगर येथे सकाळी भेट घेतली त्यानंतर अजित पवार हे थेट शेवगाव तालुक्यात शेतकरी आंदोलन करत असलेल्या घोटण आणि खानापूर गाव गाठलं.

ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी हा गोळीबार केला त्या पोलिस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी हिवाळी अधिवेशनात करणार आहे व जखमी शेतकऱ्यांचा जो काही खर्च आहे तो खर्च मी स्वतः करणार आहे असे आश्वासन अजित पवार यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दिले आहे. घोटण येथे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना संबोधित करताना अजित पवार बोलत होते.

Loading...

तसेच आंदोलनकर्त्या शेतकऱ्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी आपण हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न विचारणार आहोत. सरकारवर टीका करताना यांनी हेच का अच्छे दिन ज्या कामासाठी तुम्हाला जनतेने निवडून दिले ते काम न करता कसाया सारखे काय वागतात. याचा जाब सरकारला हिवाळी अधिवेशनात विचारला जाईल असा इशारा अजित पवार यांनी सरकारला दिला.

यावेळी घोटण वाघोटण परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अजित पवार यांनी खानापूर येथे जाऊनही येथीलही शेतकऱ्यांच्या भावना समजावून घेतल्या व त्या गावातील महिलांना पोलिसांनी कालच्या आंदोलनात कशा प्रकारे वागणूक दिली. याचा पाढा ही खानापूर येथील महिलांनी अजित पवार यांच्यासमोर वाचला.

पहा काय म्हणाले अजित पवार ?

Add Comment

Click here to post a comment
Loading…