वृत्तपत्रात जाहिरात दिली तशी कर्जमाफी खरंच झालीये का ? अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

नागपूर: ‘३१ ऑक्टोबरला तुम्ही वृत्तपत्रात जाहिरात दिली की ३४ हजार कोटींची कर्जमाफी झाली आहे. तशी ती खरंच झालीये का ते सांगा. स्टॅम्प पेपरवर लिहून देण्याची गरज नाही. जे उत्तर आहे ते इथे द्या’ असा सवाल करत हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना चांगलच धारेवर धरल.

सुभाष देशमुख एक सांगतात, चंद्रकांत पाटील दुसरंच बोलतात मुख्यमंत्री वेगळीच कोणतीतरी घोषणा करतात, यावरून अस स्पष्ट होत की सरकार मध्ये कर्जमाफी बाबत एकवाक्यता नाही अशी टीका सुधा अजित पवार यांनी सभागृहात केली आहे.