अकोला – अमरावतीचे नाव सातासमुद्रापार; गिनीज बुकात पोहचला महामार्ग!

अकोला - अमरावती

अमरावती –      अखंड बिटूमिनस काँक्रीट पेव्हींगच्या कामाला दि. ३ जून रोजी सकाळी ७.२७ वाजता सुरवात करण्यात आली. हि सुरवात अमरावती जिल्ह्यातील लोणी पासून करण्यात आली. अकोला – अमरावती राष्ट्रीय महामार्ग(Highway) क्रमांक ५३ (आधी राष्ट्रीय मार्ग ६ होता) Rajpath Infracon ह्यांनी सलग १०९ तासात ४२.२०० किलोमीटर बिट्यूमिनस काँक्रीटचे पेव्हिंग करत जगातील सर्व विक्रम मोडले. आणि जागतिक नवीन असा विक्रम केला

राजपथ इन्फ्राकाँन चे व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड(Guinness Book of World Records) चे प्रमाणपत्र देण्यात आले. माना कॅम्प येथे हे देण्यात आले असून. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे निर्णायक स्वप्नील डांगरीकर यांनी प्रमाणपत्र दिले.

अखंड बिटूमिनस काँक्रीट पेव्हींगच्या कामाला दि. ३ जून रोजी सकाळी ७.२७ वाजता सुरवात करण्यात आली. हि सुरवात अमरावती जिल्ह्यातील लोणी पासून करण्यात आली.त्यांनतर बु.रात्री ९.२० वा. अकोला जिल्ह्यातील नवसाल ह्या ठिकाणी १०९.८८ तासांनी काम थांबवून ८४.४०० किलोमीटरचा नवीन असा जागतिक विक्रम करण्यात आला. व गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने घोषित केले.

काम अत्यंत कठीण होते विदर्भातील तापमान सुमारे ४५ – ४६ अंश होते त्यातून घामाच्या निघणाऱ्या धारा त्यात ५ दिवस आहारात्र काम करत होते. त्यामुळे आज अमरावती – अकोला चे नाव सातासमुद्रापार पोहचले त्यांच्या घामाचे फळ मिळाले. कामात खूप अत्याधुनिक मशनरींचा वापर करण्यात आला त्यात
४ हॉटमिक्स प्लांट
४ व्हीललोडर
१ पेव्हर
१ मोबाईल फिडर
६ रोलर
१ पीटीआर मशीन
१०६ हायवा
आदी सामग्रीचा वापर करण्यात आला त्यात अनेक अभियंते, पर्यवेक्षक, कारागीर असे ७२८ कारागीर काम करत होते माघील सहा महिन्यांपासून रस्त्याचे चार थर टाकण्यात आले असून, विक्रम झाला तेव्हा ५ वा थर टाकण्यात आला आहे.

अमरावती – अकोला मार्ग हा खुप खराब झाला होता. प्रवाशांचे खूप हाल होत होते अक्षरशः वैतागले होते परंतु अमरावती – अकोला राष्ट्रीय महामार्गावरील 75 किलोमीटरचा रस्ता अवघ्या पाच दिवसात पूर्ण झाला आणि अखेर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये याची नोंद झाली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रस्ता निर्मितीचा एक ऐतिहासिक, जागतिक विक्रम झाला आहे.आणि जनतेला हि त्याचा मोठा फायदा होणार आहे

अभिमानाची बाब असून अकोला – अमरावतीचे(Akola – Amravati) विश्वात नाव झालं.

महत्वाच्या बातम्या –