अल कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीची भारताला धमकी

अल कायदाचा म्होरक्या अल जवाहिरी

ओसामा बिन लादेनच्या दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीने काश्मीरवरून पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. त्याने काश्मीरमध्ये दहशतवाद भडकावणारा संदेश जारी केला आहे. दरम्यान, त्याने ‘Don’t Forget Kashmir’ (काश्मीरला विसरू नका) या नावाने संदेश देत केवळ भारतालाच इशारा दिला नाही, तर त्याने भारतात दहशतवाद पसरवणाऱ्या दहशतवाद्यांचे आणि त्यांच्या कृत्यांचे समर्थनही केले आहे.

अल कायदाच्या मीडिया शाखेने जारी केलेल्या संदेशात दहशतवादी मुसाचेही छायाचित्र लावण्यात आले आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवणाऱ्या दहशतवाद्यांसमोर येऊन त्यांना समर्थन देणे आणि त्यांचे समर्थन घेणे हा त्यामागचा अल जवाहिरीचा हेतू असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, त्याने आपल्या संदेशात पाकिस्तानवरही टीका केल्याचे दिसत आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या –

आदित्य ठाकरे ‘जन आशीर्वाद यात्रा’ काढणार

नागरिकहो सावधान..! आता पुण्यात आलीये मगर

‘मनसे आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येवून भाजपला शह द्यावा’

Add Comment

Click here to post a comment
Loading…