मराठवाड्यात कृत्रिम पावसासाठी सर्व यंत्रणा सज्ज – चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील

मराठवाड्यात कमी पाऊस झाल्यानं कृत्रिम पावसासाठी लागणारी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल तुळजापूर येथे भाजप कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यात नळदुर्ग इथं अप्पर तहसील कार्यालय सुरु करण्यात येईल, अशी घोषणाही पाटील यांनी केली. मराठा आरक्षण जसं उच्च न्यायालयात टिकलं तसं ते सर्वोच्च न्यायालयातही टिकू दे अशी प्रार्थना आपण देवी चरणी केली असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, पाटील यांच्याकडून हा दावा केला जात असला तरीही कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी केंद्र सरकारकडे राजू शासनाकडून परवानग्या मागितल्या आहेत. या परवानग्या ३० तारखेपूर्वी मिळण्याची शक्यता आहे. परवानगी मिळताच कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार आहे, अशी माहिती स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर दिली आहे . त्यामुळे पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराजाला आणखी प्रतीक्षा पहावी लागणार आहे.

Loading...

दरम्यान, तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर, नळदुर्ग, सावरगाव या तीन गावातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये आणत आ. सुजितसिंह ठाकुर आणि भाजपचे युवा नेते रोहन देशमुख यांनी आघाडीला उस्मानाबाद जिल्ह्यात मोठा धक्का दिला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या निवडीनंतर काल हे पक्षप्रवेश करून घेण्यात आले. पाटील यांना या दोन नेत्यांनी एकप्रकारे गिफ्ट दिल्याचं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

पुढचा मुख्यमंत्री कोण हे शिवसेनेने ठरवावा -आदित्य ठाकरे

विधानसभेत शेतकरी अन् जनावरांचे प्रश्न मांडले – सुमन पाटील

Loading…