सर्व आमदारांनी आपापल्या मतदारसंघात जाऊन शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा – बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात

राज्यात परतीच्या पावसाने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यात सरकार नसल्याने शेतक-यांना मदतही मिळत नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांनी आपापल्या मतदारसंघात जाऊन नुकसानग्रस्त शेतक-यांना भेटून दिलासा द्यावा आणि त्यांना मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांना दिल्या आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी आज काँग्रेस पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, परतीच्या पावसाने राज्यातील शेतक-यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. राज्यात सरकार अस्तित्वात नसल्याने प्रशासनाकडून पंचनामे होऊन मदत मिळण्यास उशीर होत आहे. अगोदरच अतिवृष्टीमुळे हाता तोंडाशी आलेले खरीप वाया गेले आहे.

वेळेत मदत मिळाली नाही तर रब्बी हंगामही वाया जाण्याची भिती आहे. त्यामुळे सर्व आमदारांनी आपापल्या मतदारसंघात जाऊन शेतक-यांची भेट घेऊन त्यांना दिलासा द्यावा आणि मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना प्रदेशाध्यक्षांनी केली. यानंतर काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार आपापल्या मतदारसंघाकडे रवाना झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने केला हात पुढे, पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी मिळून देणार 50 लाख

पूरग्रस्त भागातील पिकांचे १०० टक्के पंचनामे करणार; शेतकऱ्यांना योग्य ती मदत देऊ – कृषिमंत्री

कृषी अधिकारी पोहचले बांधावर ; पिकांचे पंचनामे अजूनही सुरुच

पावसामुळे फळभाज्या आणि पालेभाज्या खराब झाल्याने भाज्यांचे दर गगणाला भिडले