सर्व शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे सौरऊर्जेवर आणणार – चंद्रशेखर बावनकुळे

सौरऊर्जा

अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढविण्याकरीता शासन विविध निर्णय घेत आहे. अपारंपरिक ऊर्जेला प्रोत्साहन देत राज्याने निश्चित केलेल्या १४ हजार ४०० मेगावॉट वीजनिर्मितीपैकी १२ हजार मेगावॉट अपारंपरिक ऊर्जानिर्मितीमध्ये राज्य यशस्वी झाले आहे. तसेच सर्व शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांना सौरऊर्जेवर आणण्यात येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेगाव येथील आनंदविहार येथे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण व गजानन महाराज संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पारेषणसंलग्न सौरविद्युत प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

श्री. बावनकुळे म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी वीज, रस्ते, पिकाला चांगला भाव व रोजगाराची उपलब्धता यासाठी शासनाकडून प्रयत्न होत आहेत. तसेच ऊर्जा विभागाने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले. पूर्वी शेतकऱ्यांना वीज मिळण्यात अडथळे येत होते. त्यामुळे गत चार वर्षामध्ये राज्यात साडेसात लाख शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्यात आली.

या वेळी संस्थानच्या सोलर कुकिंग योजनेला एक कोटी ५० लाखांचे अनुदान जाहीर करत लवकरच या योजनेचे उद्घाटनही करण्यात येईल. संस्थानमध्ये उभारण्यात आलेल्या सुमारे तीन मेगावॉट पारेषणसंलग्न विद्युत प्रकल्पाद्वारे ३८ लाख युनिटची वीजनिर्मिती केली जात आहे पण संस्थानची ऊर्जेची गरच ही ५० लाख युनिटची आहे. त्यामुळे उर्वरित १२ लाख युनिटच्या वीजनिर्मितीसाठी संस्थानने पन्नास टक्के वाटा उचलला तर ५० टक्के खर्च शासनाकडून करण्यात येईल, असेही यावेळी चंद्रशेखर बावनकुळे सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

Budget 2019 : झीरो बजेट शेतीवर आमचा भर – सितारामन

पूरग्रस्त भागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वच्छता मोहीम राबवणार

८० वर्षे वयावरील सेवानिवृत्तीधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना अतिरिक्त निवृत्तीवेतन – सुधीर मुनगंटीवार