‘या’ शहरात आजपासून सर्व दुकाने २ वाजेपर्यंत राहणार खुली !

पिंपरी-चिंचवड – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह देशभरात हाहाकार माजवला आहे. मार्च पासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत गेल्याने आरोग्य सेवेवर प्रचंड ताण निर्माण झाला होता. यामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आलेख हा उतरता असल्याचं दिसून येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ जून पर्यंत निर्बंध वाढवण्याचा निर्णय घेतला असला तरी ज्या शहरांमध्ये (१० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या महापालिका) आणि जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट हा १० टक्क्यांच्या खाली असेल त्यांना अधिक शिथिलता देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पुणे शहरलगत असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये देखील निर्बंधांमध्ये आता शिथिलता देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या ही पाचशेच्या आत आली आहे. त्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट हा १० टक्क्यांच्या खाली आला आहे. त्यामुळे, पिंपरी चिंचवड शहरातील सर्व दुकाने आजपासून  सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत दर सोमवारी ते शुक्रवारी सुरू राहतील. तर, शनिवारी आणि रविवारी केवळ अत्यावश्यक सेवांमधील दुकाने सुरू राहणार आहेत. याशिवाय, शहरातील उद्यानं, व्यामशाळा (जिम), हॉटेल बंद राहणार आहेत. पुढील दहा दिवसांसाठी हा आदेश लागू असणार आहे.

जाणून घ्या कशा-कशासाठी असेल सूट ?

१.अत्यावश्यक सेवामधील नमूद दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ वाजपेर्यंत सुरू राहातील.

२. मनपा क्षेत्रातील सर्व बँका कामाचे सर्व दिवस सुरू राहातील.

३. अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ वाजपेर्यंत सुरू राहणार आहेत. रेस्टॉरंट व बार हे केवळ पार्सल व घरपोच सेवेसाठी सुरू राहतील.

४. ई-कॉमर्स मार्फत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त वस्तू यांची घरपोच सेवा सुरू करण्यास मूभा राहील.

५. दुपारी ३ वाजेनंतर वैद्यकीय सेवा व इतर अत्यावश्यक कारण, अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास संपूर्णत: प्रतिबंध राहील.

६. सर्व शासकीय कार्यालये २५ टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहातील.

७. मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ वाजपेर्यंत सुरू राहातील.

महत्वाच्या बातम्या –