युतीला जागावाटपावर समसमानच जागा मिळतील- संजय राऊत

संजय राऊत

शिवसेनेचे युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जनआशिर्वाद यात्रा सुरू केली, त्यावरून त्यांना लोकांपर्य़ंत पोहोचायचे आहे. आदित्य यांना मी लहानपासून ओळखतो. वयात फरक असला तरीही आम्ही चर्चा करतो. लोकांना समजून घेण्याची त्यांची शक्ती मोठी आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

तसेच राज्यातील भाजपाचे नेते, प्रभारी भाजपा जास्त जागा लढविणार असल्याचे म्हणत आहेत, याकडे लक्ष वेधले असता राऊत यांनी यावर भाजपाचे कान टोचले आहेत. शिवसेनाप्रमुखांनी नेता बनून पक्ष वाढविण्याचा निर्णय घेतला होता. तो गेल्या 50 वर्षांपासून फोकसमध्ये होते. बदलत्या काळानुसार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदी बसण्याचा निर्णय घेतला असेल तर चुकीचे नाही.

केंद्रात मोदींची सत्ता आमच्या मदतीनेच आली आहे. आम्ही जुळे भाऊ आहोत. मोठा-छोटा ही राजकीय व्याख्या राजकारणात बदलावी लागते, असे सांगत जागावाटपावर समसमानच जागा मिळतील असा संदेश राऊत यांनी दिला आहे.तसेच मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस आणि अमित शहा हे बोलतील तेच आम्ही ग्राह्य धरू, अन्य कोणी काय बोलते ते त्यांचे मत असते. यामुळे विधानसभा युतीमध्येच लढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

दुधाला हमीभाव जाहीर करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही

मराठवाड्यात कृत्रिम पावसासाठी सर्व यंत्रणा सज्ज – चंद्रकांत पाटील

ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं – खासदार संजय राऊत