जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी केवळ ६५ कोटींचे वाटप

शेतकरी

परभणी – शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी पंतप्रधान विमा योजना अंमलात आणली. पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत रिलायन्स जनरल इन्शुरन्स विमा कंपनीची तीन वर्षांसाठी केंद्र शासनाने परभणी जिल्ह्यासाठी निवड केली आहे. खरीप हंगाम २०२०-२१ मध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही विमा कंपनीने शेतकऱ्यांना केवळ दीड लाख नुकसानभरपाई अदा केली.

त्यामुळे केंद्र, राज्य व शेतकऱ्यांनी भरलेला विमा हप्ता असे एकूण जवळपास २४० कोटींहून अधिक रुपये विमा कंपनीकडे जमा झाले आहे. मात्र, त्यातील केवळ ६५ कोटींचे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप केले आहे. त्यामुळे पहिल्याच वर्षी एकट्या परभणी जिल्ह्यात दीडशे कोटींचा नफा विमा कंपनीला झाल्याची चर्चा जिल्ह्यांमध्ये सुरू आहे.

परभणी जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे करून प्रति हेक्टरी राज्य शासनाने ८ हजार ६०० रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना अदा केले. मात्र शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीला कळविले नाही, ही आडकाठी टाकून कंपनीने विमा देण्यास नकार दिला.

महत्वाच्या बातम्या –