पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत लातूरात सूक्ष्म सिंचनातील ११ कोटी रुपयांचे अनुदान वाटप

सूक्ष्म सिंचन

राज्यातील जिरायती क्षेत्राचे प्रमाण ८० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तसेच सिंचित क्षेत्रामध्ये देखील पाण्याच्या उपलब्धतेत शाश्वतता नाही. अमर्याद उपशामुळे भूजलपातळीत सातत्याने होत असलेली घट, नगदी पिकाखालील वाढत असलेले क्षेत्र, पारंपरिक सिंचन पद्धतीमुळे पाण्याचा होणारा अपव्यय, पर्जन्यमानातील असमानता आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतीचे जलव्यवस्थापन ही बाब अत्यंत संवेदनशील झाली आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; आता शेततळ्यासाठी ९५ हजार रुपये अनुदान

प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतास पाण्याची उपलब्धता करणे आणि पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळविणे या उद्देशाने सन 2015-16 पासून सूक्ष्म सिंचन योजना ही प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना या केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेमध्ये समाविष्ट केली आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यावर्षी सोमवार (ता.१७) पर्यंत लातूर विभागातील पाच जिल्ह्यातील ५ हजार ६०५ शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार संचाचे ११ कोटी ६० लाख ४५ हजार रुपये अनुदान वाटप करण्यात आले आहे. तसेच ठिबक आणि तुषार संचाचे मिळून एकूण ३ हजार ६६४.२८ हेक्टर एवढे क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आले, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

मार्चमध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होणार; शेतकऱ्यांची कर्जमाफी हा प्रथमोपचार – उद्धव ठाकरे

आतापर्यंत ५ हजार ६०५ शेतकऱ्यांना ११ कोटी ६० लाख ४५ लाख रुपयांचे अनुदान देण्यात असून त्यामध्ये ठिबकचे ७ कोटी ५३ लाख ३८ हजार रुपये आणि तुषारचे ४ कोटी ७ लाख ८ हजार रुपये अनुदान वाटप करण्यात आले.

 महत्वाच्या बातम्या –

मार्चमध्ये होणार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती; ‘हे’ केलं तरच मिळेल कर्जमुक्ती

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी जाणून घ्या…