हमीभाव द्यावा, अथवा गांजा लावण्याची परवानगी द्या ; सरपंचाचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

टीम महाराष्ट्र देशा : हमीभाव आणि स्वामिनाथन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरला पण त्याच्या या लढ्याला यश काही मिळाल नाही. त्यामुळे आता शेती काही परवडत नाही असं सर्रास बोललं जात त्यामुळे अशात आम्हाला गांजा लावायला परवानगी द्या असं खासगीत बोललं जात. मात्र, आता लातूर येथील एका शेतकऱ्याने वैतागून गांजा लावण्याची मागणी चक्क जिल्हाधिकाऱ्यांकडेच केली आहे.

शिरुर अनंतपाळ तालुक्यातील हिसामाबाद (उजेड) या गावचे सरपंच असणाऱ्या हमीद पटेल या शेतकऱ्याने  जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहले आहे. यात गांजा लागवडीची परवानगी मिळावी, अशी मागणी केली आहे.

पटेल यांच्याकडे दीड एकर जमीन आहे. ते सोयाबीन, तूर, हरभरा ही पिके घेतात. तथापि, या शेतमालास भाव मिळत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. ही पिके घेणे परवडणारे नाही, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.