गहू तांदळासोबत मक्याचेही ऑगस्ट महिन्यात होणार वितरण

मालेगाव : धान्य वितरण अधिकारी, मालेगाव यांच्या कार्यक्षेत्रातील रास्तभाव दुकानदार यांना ऑगस्ट 2020 या महिन्याचे धान्य दुकानात उपलब्ध करुन दिलेले असून त्याचा वाटपाचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.

सुके खोबरे खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

अत्योदय योजना – 10 किलो गहु, 16 किलो मका व 9 किलो तांदुळ व 1 किलो साखर धान्य विक्री दर (प्रति किलो) 2 रु गहू, 1 रु मका, 3 रु तांदुळ, 20 रु साखर

प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजना – 1 किलो गहु, 2 किलो मका व 2 किलो तांदुळ धान्य विक्री दर (प्रति किलो) 2 रु. गहु, 1 रु मका, 3 रु तांदुळ

ऑगस्ट 2020 साठी योजनांनिहाय पात्र लाभार्थ्यांना धान्य वितरीत करण्यांत येणार आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना 10 किलो गहु, 16 किलो मका व 9 किलो तांदुळ असे 35 किलो धान्य देय आहे. तसेच प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेतील कार्डधारकांना प्रति सदस्य 1 किलो गहु, 2 किलो मका व 2 किलो तांदुळ असे 5 किलो धान्य देय आहे. शिधापत्रिकाधारक यांनी स्वस्तधान्य दुकानातून धान्य घेते वेळेस एकाच वेळी गर्दी करु नये. शिधापत्रिकधारक यांनी कुटूंबातील एकाच सदस्याला धान्य घेण्यासाठी स्वस्तधान्य दुकानात पाठवावे. शिधापत्रिकाधारक यांनी धान्य घेते वेळेस चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल लावून स्वस्तधान्य दुकानात जावे. कार्डधारक यांनी त्यांचे रास्तभाव दुकानासमोर आखलेले रकाने (खाने) मध्ये तसेच कार्डधारकांमध्ये कमीत कमी 3 फुटाचे (1 मीटर) अंतर राखून धान्य घेणेसाठी स्वस्तधान्य दुकानासमोर उभे रहावे.

तुप खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, तुम्हाला माहीत आहेत का?

ऑगस्ट 2020 मध्ये स्वस्तधान्य दुकानदाराकडून धान्य कमी देणे, जादा रक्कमेची आकारणी करणे, धान्याची पावती न देणे आदि बाबतीत तक्रार असल्यास त्यांनी श्री. पी. बी. मोरे, पुरवठा निरीक्षण अधिकारी, विभाग- कॅम्प / संगमेश्वर संपर्क क्रं 9764185855, श्री. आर. रामाघरे, पुरवठा निरीक्षण अधिकारी, विभाग- नवापुरा संपर्क क्रं. 9823900279, श्री. एस. एस. शिंदे, पुरवठा निरीक्षक, विभाग- इस्लामपुरा संपर्क क्रं. 7620681029. धान्य वितरण अधिकारी मालेगाव शहर कार्यक्षेत्रातील पुरवठा निरीक्षण अधिकारी व पुरवठा निरीक्षक यांचेकडे भ्रमणध्वनीव्दारे तक्रार दयावी. असे आवाहन धान्य वितरण अधिकारी सुरेश थोरात यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

  महत्वाच्या बातम्या –

कांदा खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

‘या’ तालुक्यात काजू उपकेंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार