‘ब्रेक दि चेन’ आदेशामध्ये परराज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या मालवाहतुकीच्या अनुषंगाने सुधारणा

‘ब्रेक दि चेन’ आदेशामध्ये परराज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या मालवाहतुकीच्या अनुषंगाने सुधारणा आदेश

मुंबई – राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. १२ मे, २०२१ रोजी लागू करण्यात आलेल्या ‘ब्रेक दि चेन’ आदेशातील परराज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या मालवाहतुकीच्या अनुषंगाने मुद्दा क्र. ३ मध्ये सुधारणेबाबतचे आदेश राज्य शासनाने आज निर्गमित केले आहेत. हे आदेश दि. १२ मे रोजीच्या आदेशाप्रमाणे दि. १ जून २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू राहतील.

दि. १२ मे रोजीच्या आदेशातील मुद्दा क्र. 3 आता पुढीलप्रमाणे वाचण्यात यावा. ‘मालवाहतूक करणाऱ्यांसाठी साधारणत: दोन पेक्षा जास्त लोक (एक चालक+ क्लीनर किंवा मदतनीस) किंवा विशेष स्थितीत, लांब पल्ल्याच्या प्रवास किंवा आपत्कालीन स्थितीत मालवाहतूक करणाऱ्यांसाठी तीन व्यक्ती (दोन चालक+ क्लीनर/ मदतनीस) यांना प्रवास करण्याची परवानगी असेल. जर हे मालवाहक महाराष्ट्र राज्याबाहेरुन प्रवास करुन राज्यात येत असतील तर त्यांच्या शरीराचे तापमान व इतर लक्षणे तसेच ‘आरोग्य सेतू’ मध्ये त्यांच्या स्थितीची शहानिशा केल्यावरच त्यांना राज्यात प्रवेश मिळेल. जर यापैकी एकाही व्यक्तिला लक्षणे असतील किंवा ताप असेल किंवा ‘आरोग्य सेतू’ मधील त्यांची स्थिती ‘सुरक्षित नाही (नॉट सेफ)’ अशी असेल तर त्या सर्वांना जवळच्या कोविड केअर सेंटर मध्ये पुढील  तपासणीसाठी दाखल करण्यात येईल.’

महत्वाच्या बातम्या –