शेतकर्‍यांना अमित शाह यांनी केले ‘हे’ आवाहन

अमित शाह

नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध करत गेल्या चार दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाले आहेत..केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या 3 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी आंदोलक शेतकरी गाजियाबाद-दिल्ली सीमेवर पोहोचले आहेत.

किमान आधारभूत किमतीत (MSP)आम्हाला गॅरंटी हवी आहे. आम्ही दुसऱ्या शेतकरी संघटनेसोबत चर्चा करणार आहोत आणि त्यानुसार पुढील पाऊल उचलण्यात येईल, अशी माहिती भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते चौधरी राकेश टिकैत यांनी दिली आहे. तर शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचा थेट परिणाम दिल्ली आणि आजूबाजूच्या जनजीवनावर झाल्याचं दिसून येतंय. शेतकऱ्यांचा हा पवित्रा लक्षात घेऊन केंद्र सरकार अखेर नरमलं आहे. सरकारनं शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत येण्यासाठी सीमेवर तळ ठोकून बसलेल्या शेतकर्‍यांना आंदोलन संपवण्याचे आवाहन केले असून त्यांना चर्चेला येण्याचे आवाहन केले आहे. शाह यांनी म्हटले की, शेतकर्‍यांच्या सर्व समस्या आणि मागण्यांवर विचार करण्यासाठी केंद्र सरकार तयार असल्याचे सांगण्यात आले आहे.

कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी 3 डिसेंबरला यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बोलावले आहे. दुसरीकडे, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन मान्य करून शेतकर्‍यांना आंदोलन योग्य दिशेने नेल्यास मार्ग लवकरात लवकर निघेल, असे आवाहन केले आहे.

महत्वाच्या बातम्या –