अमरावती : शेतकऱ्यांच्या खात्यात तुरीचे अनुदान जमा न झाल्याने काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

अमरावती : तुरीची शासकीय खरेदी करण्याला नकार देत शासनाने तुरीला प्रतीक्विंटल एक हजाराचे अनुदान घोषित केले आहे. आणि आठ दिवसांत अनुदान देण्याचे आश्वासन देखील शेतकऱ्यांना दिलं होतं मात्र एक महिना उलटल्यानंतरही अद्याप शेतकऱ्यांना कुठलेही अनुदान मिळाले नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

दरम्यान सरकारच्या या शेतीविरोधी धोरणाविरोधात आक्रमक होतं अमरावती जिल्हा काँग्रेसने अंदोलनाचा इशारा दिला आहे.शेतकऱ्यांना तुरीचे अनुदान तात्काळ देण्यात यावे. तसेच खरेदी केलेल्या तुरीचे चुकारेही मिळावेत. अन्यथा तीव्र अंदोलन छेडण्यात येईल असा इशारा काँग्रेसचे बबलू देशमुख यांनी दिला आहे.

कर्जमाफीच्या घोळात शेतकरी अडचणीत सापडला असताना एक वर्षानंतरही प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाही. आजही कर्जाच्या प्रतीक्षेत जिल्ह्यातील ५० ते ६० हजार शेतकरी आहे. गतवर्षी तुरीचे चांगले उत्पन्न झाले होते. त्यामुळे कर्जाची परतफेड होर्ईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असताना शासकीय खरेदीही बंद आहे. तसेच खासगी बाजारात शेतकऱ्यांची सुमार लूट केली जात आहे.शेतकऱ्यांचा रोष घालवण्यासाठी प्रतिक्विंटल एक हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली आहे. येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याचे आश्वासन दिलंय. परंतु, याला एक महिन्याचा कालावधी उलटला असताना अनुदान अद्याप मिळालेले नाही, असा आरोप बबलू देशमुख यांनी केला आहे.

नेवासा येथे शेतकरी आंदोलनकर्त्यांना अटक

तूर खरेदीसाठी राज्यभरात 159 केंद्रे; योजनेमध्ये शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सुभाष देशमुख