ई-पॉसवर खताच्या विक्रीची नोंद घेऊन ती पावती भौतिक बिलाच्या मागे जोडण्याचे आवाहन

औरंगाबाद – जिल्ह्यातील सर्व अनुदानित खत विक्री करणाऱ्या खत उत्पादक कंपन्या, होलसेलर, रिटेलर्स यांना खतविक्री करण्यासाठी ई-पॉसवर मशिनींचे वितरण करण्यात आले आहे. रासायनिक खत साठा प्रत्यक्षात विक्री केल्यानंतरही त्याची त्वरीत नोंद ई-पॉसवर न केल्याने ई-पॉसवरवरील साठा मोठ्या प्रमाणात शिल्लक दिसतो. यामुळे खत पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊ नये यासाठी रिअल टाइम बेसीसवर रासायनिक खत विक्री करताना त्याचवेळी ई-पॉसवर खताच्या विक्रीची नोंद घेऊन ती पावती भौतिक बिलाच्या मागे जोडण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार सर्व विक्रेत्यांना केले आहे.

खत पुरवठ्यातील अडचणी संदर्भात नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषि समिती सभापती एल. जी. गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी परवाना अधिकारी तुकाराम मोटे, जिल्हा फर्टिलायझर्स पेस्टिसाइड अँड सीड्स असोसिएशन अध्यक्ष राकेश सोनी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे उपस्थित होते.

यावेळी रासायनिक खत ऑफलाईन विक्रीस प्रतिबंध घालणे व त्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी रियल टाईम बेसवर रासायनिक खत विक्री करतांना त्याचवेळी ई-पॉसवर खताच्या विक्रीची नोंद करुन ऑफलाईन विक्रीस प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हयातील सर्व गुण निरिक्षकांना तपासणीच्या सुचना देण्यात आल्या.

महत्वाच्या बातम्या –