जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्याचा अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न

पेटवून घेण्याचा प्रयत्न

भारतात जास्तीत जास्त लोक ग्रामीण भागात शेती करतात. आपल्या भारतात पूर्वीपासून सखोल शेती केली जाते. म्हणून भारताला ‘कृषी प्रधान’ देश म्हटले जातात. शेतकऱ्यांला शेती करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींमध्ये प्रथम “सुपीक” जमीन आणि नंतर “पाणी” लागते. शेतकऱ्याला त्याची जमीन म्हणजे ती त्याची काळी आई असते. त्यात त्याची जमीन कोणी बळकवण्याचा प्रयत्न जरी कोणी केला तर तो कसा शांत बसेल.

दोन लाखांची कर्जमाफी हे बुजगावणं – बच्चू कडू

नागपूर – रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला न देता पोलीस आणि महसूल प्रशासनास पुढे करून दंडेलशाहीने महामार्गाचे काम सुरू असल्याचा आरोप होत आहे. हे काम करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होत आहे.

आम्हाला सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी द्या; शेतकऱ्यांचं पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पत्र

शेतकऱ्यांकडून दिवसेंदिवस विरोध वाढत आहे. तसेच तेथील अधिकारी हे शेतकऱ्यांना दमबाजी करत आहे व त्यांच्याकडून काम करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे तेथील शेतकरी हे खूप त्रस्त झाले आहेत. बुधवारी सकाळी गणेशवाडीमधील एका शेतकऱ्याने महामार्गाचे अधिकारी शेतात जाऊन काम सुरू करण्याच्या प्रयत्नात होते त्यावेळी त्या शेतकऱ्याने अंगावर डिझेल ओतून घेतले व स्वत:लाच पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यात विशेष म्हणजे हा सर्व प्रकार पोलीस खात्याच्या समोर घडला.

शेतकऱ्यांचे हाल ; कृषी कार्यालयाचा परमीट देण्यास नकार

मंगळवारी सकाळच्या सुमारास खोमनाळ बायपास रस्त्यालगत असलेल्या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन अधिकाऱ्यांनी काम सुरू केले असता त्या शेतकऱ्यांनी विरोध केला व त्यामुळे तेथील वातावरण काही वेळ तणावपूर्ण झाले होते़. शेतकऱ्यांच्या जमिनीची रक्कम मिळाली नाही तरीही ठेकेदार हे शेतकऱ्यांना दमदाटी करत आहे.

महत्वाच्या बातम्या –

जलवाहिनी दुरुस्तीसाठी काम करणाऱ्या अभियंत्यांचे आदित्य ठाकरे यांच्याकडून कौतुक

हरभऱ्याच्या क्षेत्रात सरासरीच्या दीडपट वाढ झाल्याने, भरघोस उत्पादन