राज्यात गेल्या २४ तासात 8 हजार 159 कोरोना रुग्णांची वाढ; तर ‘इतक्या’ रुग्णांचा मृत्यू

कोरोना

मुंबई –  महाराष्ट्रातील रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होती. मात्र आज त्यात किंचीत वाढ झालीय. तसेच कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. : राज्यात गेल्या २४ तासात एकूण 8 हजार 159 कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात गेल्या २४ तासात 7 हजार 839 जण कोरोनामुक्त झालेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.33 टक्के आहे. तर गेल्या २४ तासात 165 करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण 60,08,750 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, राज्यात आजपर्यंत 1,30,918 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यातील मृत्यूदर 2.09 टक्के इतका आहे. राज्यात सध्या 94 हजार 745 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

तर मुंबईत गेल्या 24 तासात 560 जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर 430 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. गेल्या 24 तासात 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 6,020 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1097 दिवसांवर गेला आहे.

महत्वाच्या बातम्या –