शेतकरी(Farmers) हा अन्नदाता असून, नुकतेच सोयीचे दिवस येत असताना शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा नवी संकट उभे राहिले आहे, महाराष्ट्रात मोठ्या संख्यने हरबरा उपलब्ध असून केंद्र सरकारने हरभरा खरेदी हमीभाव केंद्रे बंद करा असा आदेश दिला आहे. त्यामुळे हरबरा संकटात असून भाव पडण्याची शक्यता आहे. हरबरा पीक घेणारे शेतकरी बांधवांस आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात (२०२१- २०२२) यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात हरभरा पीक घेण्यात आले, एकरी उत्पादनात वाढ झालेली बघायला मिळत आहे. महारष्ट्रात ३२.८३ लाख मेट्रिक टन अपेक्षित उत्त्पन्न होते परंतु ८.२० लाख मेट्रिक टन वाढीव उत्पन्न झाले ५२३० रुपये प्रति क्विंटल या भावाने सध्या हरभरा खरेदी होत आहे.
हरभरा खरेदी(Buy a gram) पूर्ण झाली असून केंद्राने अचानक हरभरा खरेदी करणे थांबवले आहे. ऑनलाईन पोर्टल(Online website) वर खरेदी – विक्री करण्यात येते पण ती साईट सुद्धा २३ मी पासून केंद्राने बंद केली आहे त्यामुळे खासगी व्यापारी हे ४५०० – ४८०० रुपये प्रति क्विंटल दराने हरभरा घेत आहेत. उत्तम दर्जेचा हरभरा कमी दराने विकावा लागत असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली होती त्यात हि हा मुद्दा घेण्यात आला, राज्य सरकारने २८ जूनपर्यंत हमीभाव मुदतवाढ देण्याची मागणी केंद्र कडे केली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- आंघोळ करताना ‘कोमट’ पाण्यात टाका मीठ ; जाणून घ्या फायदा !
- पेट्रोल – डिझेल चे नवे दर जारी ; जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव !
- मोठी बातमी – राज्य मंत्रिमंडळाने ‘हे’ घेतले महत्वाचे निर्णय !
- केंद्राच्या ‘या’ धोरणामुळे शेतकरी खड्यात जातील.. – राजू शेट्टी
- मोठी बातमी – सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय