शेतकरी विरोधी कायदा हा भांडवलदारांबरोबर केलेला सौदा – सचिन साठे

केंद्र सरकारच्या विरोधात कॉंग्रेसचे पिंपरीत आंदोलन

शेतकरी विरोधी कायदा आणि प्रस्तावित कामगार कायदा म्हणजे देशातील शेतकरी व कामगारांचा भांडवलदारांबरोबर हुकूमशाही केंद्र सरकारने केलेला सौदा आहे अशी टिका पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली.

देशाचा पोशींदा बळीराजाला उध्वस्त करणारा कायदा केंद्र सरकारने ताबडतोब मागे घ्यावा आणि हुकूमशाहीकडे वाटचाल करणा-या व भांडवलदारांना अनुकूल कायदे करणा-या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या दुर्घटनेतील पिढीत तरुणीस श्रध्दांजली वाहण्यात आली.

तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. हाथरस येथील पीडीत कुटूंबियांस भेटण्यासाठी जात असताना कॉंग्रेसचे सरचिटणीस खासदार राहूल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केली. त्याच्या निषेधार्थ केंद्र सरकार व उत्तर प्रदेशातील सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

सचिन साठे पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली पावसाळी अधिवेशनात शेतक-यांवर अन्याय करणारा जुलमी कायदा ज्या पध्दतीने चर्चेविना मंजूर करण्यात आला. तसेच देशातील पन्नास कोटी संघटीत व असंघटीत कामगारांवर अन्याय करणारे व भांडवलदारांना पुरक ठरणारे विधेयक मंजूर करण्यात आले. या घटना म्हणजे देशाच्या संसदीय लोकशाहीला काळीमा फासणा-या आहेत. यावेळी केंद्र व उत्तर प्रदेश सरकारचा निषेध करणारी भाषणे प्रमुख पदाधिका-यांनी केली.

महत्वाच्या बातम्या –