#MeToo : अनु मलिक यांची ‘इंडियन आयडॉल १०’च्या परिक्षकपदावरून हकालपट्टी

मुंबई : लैंगिक गैरवर्तनाचे आरोप करण्यात आलेले गायक-संगीतकार अनु मलिक यांचे ‘इंडियन आयडॉल’चे परिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. सध्या अनु मलिक, नेहा कक्कर आणि विशाल दादलानी हे ‘इंडियन आयडल’च्या दहाव्या सीझनमध्ये परिक्षक आहेत. मात्र लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपानंतर अनु मलिक यांना या पदावरून हटवण्यात आले आहे.

गायिका सोना मोहापात्रा आणि श्वेता पंडित यांच्यानंतर आणखी 2 महिलांनी बॉलिवूडमधील प्रसिद्ध म्यूजिक डायरेक्टर अनु मलिकवर यौन शोषणाचे आरोप लावण्यात आले आहेत. या दोन्ही महिलांनी अनु मलिक यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत आपली ओळख दाखवत धमकावल्याचा देखील आरोप केला आहे.

या संतापजनक प्रकारानंतर मिळालेल्या विश्वसनीय वृत्तानुसार, सोनी टीव्हीने अनु मलिक यांना ‘इंडियन आयडॉल १०’च्या परिक्षकपदावरून हटविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरोपांची चौकशी पूर्ण होईपर्यंत अनु या शोमध्ये दिसणार नाहीत. त्यांच्या जागी आता बॉलीवूडमधील कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.