चिंता वाढली: जिल्ह्यात गेल्या २४ तासात तब्बल ‘इतक्या’ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

कोरोना

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला होता. एप्रिल महिन्यात दिवसाला सात हाराजांहून अधिक नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आल्याने स्थिती गंभीर होत होती. यांनतर मे महिन्याच्या मध्यापासून कोरोना आकडेवारीत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. शेकड्यांमध्ये असलेली आकडेवारी ही कमी-अधिक होत असून कोरोना स्थिती पूर्ण आटोक्यात येणे गरजेचे आहे.

पुणे जिल्ह्यात ३४७ कोरोनाबाधितांना गेल्या २४ तासात डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे जिल्ह्यातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ७५ हजार १२८ झाली आहे. तर नव्याने २९४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे जिल्ह्यातील एकूण संख्या आता ४ लाख ८६ हजार ३६५ इतकी झाली आहे.पुणे जिल्ह्यात काल एकाच दिवसात ७ हजार ९३० नमुने घेण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्याची एकूण टेस्ट संख्या आता २८ लाख ५८ हजार ०९४ इतकी झाली आहे. सध्या पुणे जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या २ हजार ४८८ रुग्णांपैकी २२४ रुग्ण गंभीर तर ३३१ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. तर, पुणे महापालिका हद्दीत नव्याने ७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कालच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ७४९ इतकी झाली आहे.

महत्वाच्या बातम्या –