चिंता वाढली! कोरोना नंतर आला आता ‘हा’ नवीन आजार, ‘या’ भागात सापडला पहिला रुग्ण

कोरोनाबाधित

मुंबई – मार्च २०२० मध्ये भारत देशात कोरोना (Corona) महामारीचा पहिला रुग्ण सापडला आणि हळू हळू कोरोनाने देशभरात आपले पाय पसरायला सुरुवात केली. २०२० मध्ये भारताने कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेचा सामना केला तर २०२१ मार्च महिन्यात आलेल्या कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत देशात हाहाकार माजला. कोरोनाची तिसरी लाट पहिल्या दोन लाटांएवढी धोकादायक ठरली नसली तरी भारत देशासमोर आता एका नवीन आजाराचे संकट उभे राहिले आहे. केरळ राज्यातील वायनाड जिल्ह्यात या नवीन आजाराने आपले ठसे उमटवायला सुरुवात केली आहे.

देशात कोरोनाचा धोका कायम असताना आता केरळ राज्यात नवीन आजाराचा प्रवेश झाल्याने स्थानिक प्रशासनाची चिंता वाढली आहे. वायनाड जिल्ह्यात मंकी फिवरचा रुग्ण सापडला आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं याबद्दलची माहिती दिली आहे. वायनाडमधल्या थिरुन्नेली ग्राम पंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या पनवेली आदिवासी वस्ती मधल्या एका २४ वर्षीय व्यक्तीला क्यासनुर फॉरेस्ट डिजीजची लागण झाली आहे. स्थानिक भाषेत या आजाराला मंकी फीवर म्हटलं जाते.

या आजराबद्दल स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिथल्या जनतेला आधीच सावधानतेचा इशारा दिला होता आणि सतर्क राहण्याचे देखील आवाहन केले होते अशी माहिती दिली आहे. मंकी फीवर झालेल्या  रुग्णाला जवळच्या रुग्णालयात भरती केले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. मंकी फीवरचा अजून कोणताही रुग्ण सापडला नसून आम्ही वैद्यकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत अशी माहिती स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –