चिंता वाढली! देशावर आता ‘या’ व्हायरसचे संकट

कोरोना

मुंबई – कोरोना विषाणूच्या नव-नवीन व्हेरियंटमुळे देशातील बर्‍याच राज्यांची चिंता वाढली असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. अशातच आता एकीकडे देश कोरोना सारख्या महामारीशी लढत आहे. तर दुसरीकडे धोकादायक झिका व्हायरसचा प्रादुर्भावही वाढताना दिसत आहे. यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. केरळमध्ये झिका व्हायरसचे 15 रुग्ण आढळून आले आहेत. केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी यासंदर्भात माहिती दिली. याआधी राज्यात 14 रुग्णांची नोंद होती. आता हा आकडा 15 वर पोहोचला आहे.

नाथनकोडमधील एका 40 वर्षाच्या महिलेला झिका व्हायरसची लागण झाल्याची माहिती केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली आहे. या परिस्थितीवर आम्ही संपूर्ण लक्ष ठेवून असल्याचं त्यांनी सांगितले. एकूण 27 जणांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी झिका व्हायरस राज्यात पसरणार नाही, असा दावा केला आहे. या व्हायरसचा सामना करण्यासाठी सर्व जिल्ह्यांमधील आरोग्य सेवा यंत्रणा सज्ज असल्याचं त्यांनी सांगितले आहे. झिका व्हायरसची लक्षणे आणि परिणामांवर काटेकोरपणे लक्ष ठेऊन आहोत. राज्य सरकार हाय अलर्टवर आहे. केरळमध्ये झिका व्हायरसचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी अॅक्शन प्लॅनवर काम केले जात आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर गंभीरतेने लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, असे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार झिका व्हायरसचा प्रादुर्भाव हा डासांपासून होतो. युगांडामध्ये 1947 साली पहिल्यांदा झिका व्हायरस हा माकडांच्या शरीरात आढळून आल्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर 1952 साली हा व्हायरस माणसांच्या शरीरात आला. आतापर्यंत अफ्रिका, अमेरिका आणि आशिया खंडात या व्हायरसची माणसांना लागण झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या –