चिंता वाढली! जिल्ह्यात गेल्या २४ तासात तब्ब्ल ‘इतक्या’ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

कोरोना

पुणे – पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासात नव्याने ३६४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे  जिल्ह्यातील एकूण संख्या आता ४ लाख ८३ हजार ८८४ इतकी झाली आहे. जिल्ह्यातील ३३१ कोरोनाबाधितांना गेल्या २४ तासात डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे जिल्ह्यातील  एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ७२ हजार २४० झाली आहे. पुणे जिल्ह्यात काल एकाच दिवसात ७ हजार ०५८ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्याची एकूण टेस्ट संख्या आता २७ लाख ८५ हजार ७३२ इतकी झाली आहे.

पुणे जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या २ हजार ९५४ रुग्णांपैकी २३६ रुग्ण गंभीर तर ४८५ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कालच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ६९० इतकी झाली आहे.

कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्याहून अधिक भयंकर होती. या लाटेचे सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात दिसून आले. राज्यातील स्थिती आता आटोक्यात येत असून अद्यापही अनेक जिल्ह्यांमध्ये चिंता कायम आहे. दरम्यान, दुसरी लाट पूर्णपणे ओसरण्याआधीच तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. तसेच, या लाटेत बालकांना अधिक धोका असल्याचं सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जवळपास 60 लाख व्यक्ती बाधित होतील, असा अंदाज महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या –