चिंता वाढली : जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ

कोरोना

पुणे – या वर्षाच्या मार्च महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह देशात थैमान घातले होते. एप्रिल महिन्यात पुण्यातील स्थिती ही गंभीर बनली होती. दिवसाला सुमारे ७ ते ८ हजार नव्या कोरोना बाधितांची नोंद एकट्या पुणे शहरात केली गेली. यानंतर मे महिन्याच्या अखेरीस दुसरी लाट ओसरू लागली. सध्या दररोज सरासरी २०० ते ४०० कोरोना रुग्णांची नोंद पुणे जिल्ह्यात केली जात आहे.

कोरोना संसर्ग हा कायम असून हा रोग पूर्णपणे नष्ट होईपर्यंत संकट हे कायम आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने निर्बंधांमध्ये शिथिलता मिळावी अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ, व्यापारी संघटना आणि इतर नेत्यांनी केली आहे. पुणे महापालिका विरुद्ध राज्य सरकार असा वाद निर्माण झाल्याचे आता दिसून येत आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासात पुणे जिल्ह्यात नव्याने २३७ रुग्ण नोंद करण्यात आली आहे. तर, १८१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात २ हजार ३५५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असून यातील २१६ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून ३५१ रुग्ण हे ऑक्सिजनच्या साहाय्याने उपचार घेत आहेत. जिल्ह्यात एकूण ७ रुग्णांचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

महत्वाच्या बातम्या –