चिंता वाढली! राज्यातील ‘या’ भागात डेल्टा विषाणूचा शिरकाव

कोरोना

मुंबई – कोरोनाचा विषाणू हा सध्या अवघ्या जगाची डोकेदुखी ठरला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच संभाव्य हानी टाळण्यासाठी जगभरात सध्या मोठ्याप्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे जगभरातल्या सर्वच देशांनी आपापल्या देशातील कोरोना लसीकरणाची गती वाढवावी अन्यथा डेल्टा व्हेरिएंट अधिक जीवघेणा ठरु शकतो असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला होता.

दरम्यान आता नाशिक, मुंबई पाठोपाठ आता ठाण्यातही डेल्टा संसर्गाचा शिरकाव झाल आहे. ठाण्यात  डेल्टा संसर्गाची बाधा झालेले चार रुग्ण आढळले आहेत. संबंधित सर्व रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डेल्टा व्हेरिअंटचे रुग्ण आढळल्यानंतर ठाणे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग आणि इतर आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

ठाणे परिसरात आढळलेल्या एकूण चार डेल्टा व्हेरिअंट बाधित रुग्णांमध्ये 25 वर्षांखालील 3 रुग्ण आहेत, तर एक रुग्ण 53 वर्षांचा आहे. नाशिक आणि मुंबई पाठोपाठ ठाण्यात डेल्टा व्हेरिअंटने धडक घेतल्यानं नागरिकांमध्ये भीतीच वातावरण तयार झालं आहे. दरम्यान आता डेल्टा व्हेरिएंटचा सर्वाधिक धोका हा तरुणांना असल्याची माहिती आता समोर आली आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या बाधितांमध्ये तरुणांची संख्या अधिक असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियासह इतर देशांमध्येही हीच स्थिती असल्याचं म्हटलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या –