मुंबई – वृद्ध साहित्यिक व कलाकारांना मानधन योजनेसाठी (Honorarium scheme) अर्ज मागविण्यात आले आहेत. मुंबई शहर व मुंबई उपनगर मधील वृद्ध साहित्यिक व कलावंतांनी मानधन मंजूर करण्यासाठी 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे.
सन 2020-21 व 2021-22 या वर्षाकरीता राज्यातील मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना सन 1954-55 पासून संपूर्ण राज्यात या संचालनालयामार्फत राबविली जाते. दरवर्षी 100 च्या इष्टांकानुसार कलावंतांची निवड समिती करते. मानधन मंजूर झालेल्या कलावंतांना श्रेणी निहाय (अ श्रेणी रु.3150, ब श्रेणी रु.2700, क श्रेणी रु.2250) मानधन दरमहा सांस्कृतिक कार्य संचालालयामार्फत अदा करण्यात येते.
ज्या व्यक्तींनी साहित्य व कला क्षेत्रात मोलाची भर घातली आहे, ज्यांचे वय 50 वर्ष पूर्ण किंवा त्यापेक्षा जास्त आहे, ज्या कलावंत/साहित्यिक यांचे उत्पन्न रु.48 हजार पेक्षा जास्त नाही, जे कलावंत / साहित्यिक अन्य कोणत्याही शासकीय योजनेचा लाभार्थी नाही अशा साहित्यिक व कलावंतांना मानधन मिळण्यासाठी अर्ज करता येईल. अर्जाचा नमूना www.mahasanskruti.org या संकेतस्थळावर तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, महाराष्ट्र शासन, विस्तारभवन, म.गांधी मार्ग, मंत्रालय मुंबई 400032 या कार्यालयातही उपलब्ध असून भरलेले अर्ज याच कार्यालयात स्वीकारले जातील. अधिक माहितीसाठी ०२२-२२८४२६३४/७० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या –
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता शेतकऱ्यांना आयुष्यभर मिळणार दरमहा 3000 रुपये पेन्शन
- काय सांगता! दररोज 50 रुपये जमा केल्यावर मिळणार 35 लाख रुपये, जाणून घ्या काय आहे ‘ही’ योजना
- राज्य शासनाचा मोठा निर्णय – आता सातबारा उतारा बंद करुन केवळ प्रॉपर्टी कार्ड सुरु ठेवणार
- ऊसाच्या रसाचे कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!
- कौतुकास्पद! शेतकऱ्याचा मुलगा थेट झळकला फोर्ब्स मासिकात
- प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पशुधन विमा योजना पोहाेचवा – सुनील केदार
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने सुरु; आतापर्यंत १६१.५१ लाख टन साखर उत्पादन