‘पोलीस शिपाई’ पदासाठी मोठी भरती असा भरा अर्ज !

पोलीस शिपाई

गडचिरोली – आपल्यातील अनेक तरुण पोलीस पदाचे(Police post) स्वप्न घेऊन दिवसरात्र कष्ट करत असतात. त्यांच्यासाठी एक संधी चालून आली असून. गडचिरोली जिल्ह्यामध्ये ‘पोलीस शिपाई'(Police constable) पदासाठी जागा निघाल्या आहेत. शिक्षणाची अट ‘बारावी पास’ ठेवण्यात आली असून. अर्ज हा ‘ऑफलाईन’ पद्धतीने करायचा आहे.

पोलीस शिपाई पदासाठी एकूण जागा १३६ आहेत.

बघुयात काय आहेत शैक्षणिक पात्रता(Eligibility) –
१ ) उमेदवाराने मान्यताप्रापत शिक्षण संस्था किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेले असावे.
२ ) शिक्षण १२ पास असणे आवश्यक / अनिवार्य आहे.

गडचिरोली चे रहिवासी(Residents) आहात का ?
नक्षलग्रस्त जो भाग आहे तेथील एसटी उमेदवार आणि नक्षलवाद्यांच्या हल्यात मृत किंवा जखमी पोलीस पाटील किंवा पोळीच कर्मचारी मुले सातवी पास असल्यास ते पात्र ठरवले जातील.

पोलीस शिपाई भरती शुल्क(Fees) –
खुला प्रवर्ग : ४५०/- रुपये
मागास प्रवर्ग : ३५०/- रुपये

अर्ज ठिकाण –
गडचिरोली जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कोणतेही, तसेच पोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र, पोलीस मुख्यालय इ.

अर्ज करण्याची तारीख ०५ जून २०२२ असून ऑनलाईन अर्जासाठी पुढे क्लिक करा – https://gadchirolipolice.gov.in/

महत्वाच्या बातम्या –