कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबविण्यासाठी मान्यता

कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबविणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. तसेच त्यांनी ऑनलाइन अर्ज या संकेतस्थळावर www.agriwell.mahaonline.gov.in पाच ऑगस्ट ते चार सप्टेंबर या वेळेत करायचा आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह विहित मुदतीत अर्ज करावे व ऑनलाइन केलेल्या अर्जाची प्रत व इतर आवश्यक कागदपत्रे पंचायत समितीच्या विशेष घटक कृषी अधिकाऱ्यांकडे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा अनुसूचित जाती/नवबौद्ध अथवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी असला पाहिजे. शेतकऱ्यांच्या नावे जमीन धारणेचा सातबारा असावा. नगरपंचायत, नगरपालिका, महापालिका, क्षेत्राबाहेरील), शेतकऱ्यांकडे मिळणारे वार्षिक उत्पन्न रुपये दीड लाखापेक्षा जास्त नसावे, शेतकऱ्यांकडे सक्षम प्राधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र असावे, अर्जदाराकडे ग्रामसभेने शिफारस केलेला ठराव किंवा दाखला असावा, नवीन विहिरीचा लाभ घ्यायचा असल्यास प्रस्तावित क्षेत्रात ५०० फूट अंतरावर इतर विहीर नसावी, लाभार्थ्यांकडे आधारकार्ड व बँक खाते पासबुक आधारलिंक  असावे, अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना कर्मवीर दादासाहेब सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन वाटप झालेल्या शेतकऱ्यांना तसेच वनपट्टेधारक आदिवासी शेतकरी, दिव्यांग व महिला शेतकऱ्यांची प्राधान्याने निवड करण्यात येईल.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने सन २०१९-२० वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबविण्यासाठी मान्यता दिलेली आहे.या योजनेमध्ये नवीन विहिरीकरिसाठी अडीच लाख रुपये, विहीरीच्या दुरुस्तीसाठी ५० हजार रुपये, विद्युत जोडणी व सौर कृषी पंप यासाठी  १० हजार रुपये, विद्युतपंप संचला २० हजार रुपये, सूक्ष्म सिंचनाकरिता (ठिबक संच ५० हजार रुपये व तुषार संच २५ हजार रुपये मर्यादेत) शेततळ्याचे अस्तरीकरण एक लाख रुपये अशा अनेक गोष्टींसाठी  हे अनुदान शेतकऱ्यांना पॅकेज स्वरूपात लाभ देण्यात येणार आहे. तरी पात्र शेतकऱ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा परिषद कृषिविकास अधिकाऱ्यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या –

प्रधानमंत्री आवास योजनेतून ग्रामीण भागात ४ लाख २१ हजार घरे

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; आता शेततळ्यासाठी ९५ हजार रुपये अनुदान