मुंबई – मोदी सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्याविरोधात मागील सात महिन्यांहून जास्त काळ दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरुच आहे. आता केंद्राच्या या कायद्यामध्ये राज्य सरकारने सुधारणा करुन नवीन कृषी विधेयक सभागृहाच्या पटलावर ठेवलं आहे. त्या आधी काल सकाळी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. शेतकरी हे देशाचे अन्नदाते आहेत. शेतकऱ्यांचे हे आंदोलन गेल्या ७ महिन्यांपासून सुरू आहे. दोन-चार दिवसांचे आंदोलन किती त्रासदायक असते याची आपल्याला कल्पना आहे. हे अन्नदाता असलेले शेतकरी शत्रू आहेत का, की ते पाकिस्तानातून आले आहेत, असा असे सवाल करत आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना आपापल्या घरी पाठवण्यासाठी कितीसा वेळ लागतो, असे भुजबळ म्हणाले.
तसेच एक आत्महत्या झाली तर आपण संवेदना प्रगट करतो पण दिल्लीतील आंदोलनात आतापर्यंत 200 शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय. पण दुर्दैवाचा भाग म्हणजे मंत्री यायचे, चर्चा करायचे आणि निघून जायचे, अशा शब्दांत भुजबळ यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या –