उपोषणी -उपद्व्याप कश्यासाठी…?

नाव- साहेबराव करपे
दिनांक -19 मार्च 1986
वेळ – दुपारी 4:30
ठिकाण- चिल गव्हाण-(यवतमाळ)
घटना – जेवणात विष मिसळून आपल्या 2 पोरं आणि बायकोसह आत्महत्या

32 वर्षांपूर्वी विदर्भातल्या शेतकऱ्यांने आपल्या कुटुंबा समवेत केलेल्या आत्महत्येची, पहिली आत्महत्या म्हणून सरकार दप्तरी नोंद आहे. मात्र आज अचानक त्या आत्महत्येची आठवण का झाली असा प्रश्न तुम्हला साहजीकच पडला असेल नाही का? पण हा प्रश्न आपल्याला पडण्याऐवजी,काल ज्यांनी  उपोषण केलं त्यांना पड़ण गरजेच होत आणि ते लक्षात आणून देण्यासाठी म्हणून करपेंच स्मरण करतोय..

आदरणीय अमर हबीब ह्यांनी मागच्याच वर्षी करपे कुटुंबियांच्या स्मरणार्थ वर्षी 19 मार्च 2017 ला अन्नादात्यासाठी ,अन्न त्याग आंदोलन केल होत. त्यात सहभागी होण्यासाठी देशभारातील जनतेला आवाहन केलं गेलं. बहुतांश शेतकरी कुटुंबियांनी त्या दिवशी अन्नाला शिवलं सुद्धा नाही. आंदोलना मागचं कारण म्हणजे, आपल्याला अन्नाचं, अन्नदात्याचं, भुकेमुळे पोटात उठलेल्या आगडोंबाच आणि एकूणच उपाशी पोटी राहण्याचा त्रास काय असतो हे आपल्याला कळाल पाहिजे आणि त्याहुनही महत्वाच कारण म्हणजे लाखांचा पोशिंदा जेव्हा समाज व्यवस्थेचा बळी ठरतो त्यावेळी आपणही त्यासाठी जबाबदार आहोत, ही भावना स्विकारण्याची जाणीव व्हावी. या कारणास्तव त्या दिवशी केला गेलेला अन्न त्याग, आणि केवळ विरोधकांना मोठ करण्यासाठी अन् आपल अपयश झाकण्यासाठी वातानुकुलीत मण्डपाच्या सावलीत, खुशाल बत्तीशी विचकत, हातावर टाळ्या मारत, संध्याकाळच्या खाण्या – पिण्याच्या ओढिने भाजप नेत्यांकडून केला जाणारा आजचा उप(हा)वास बघुन,नुसती चीड़ नाही, तर तळ पायाची आग मस्तकात जात आहे …

उपोषणी -उपद्व्याप कश्यासाठी...? Amar Habib 1

– 19 मार्च 2017 ला कुठे गेले होते आजचे उपोषण वाले?

– शेतक-यांना आपल्या मागण्यांसाठी 200 किलोमीटर चालत येऊ देणाऱ्यांना,तेव्हा आपणच ‘लोकशाहीची थट्टा’ करतोय याची जाणीव का बर नाही झाली.?

– भीमा कोरेगाव दंगल घडू दिली ,तेव्हा झालेल नुकसान बघुन का नाही झाले हे अपमानित ?

-शारिरीक संबंध ठेऊ दिले नाही, म्हणून मागच्याच् महिन्यात 17 – 18 वर्षाची तरुणी ऊभी पेटवल्या गेली, तेव्हा का नाही झुकल्या ह्यांच्या माना ?

-पाठीच्या कण्याला पिळ पडेस्तोर अभ्यास करणाऱ्या 7 लाख बेरोजगारांसाठी केवळ 70 जागा काढ़ल्या गेल्या,आपल्या भविष्याची राज्यकर्त्यांनी केलेली अशी थट्टा सहन न झाल्याने एका युवतीने गळफास घेतला, तेव्हा कुठ हरवली होती ह्यांची नैतिकता?

– ज्यांच्या जीवावर सत्तेत बसले अन् परवा लाखो करोड़ो उधळत , साजाऱ्या केलेल्या ‘वर्धापन दिनी’, देशातल्या एकाही बलात्कार पिडितेला, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांला, सीमेवर शहीद झालेल्या आमच्या पोराला,श्रद्धांजली वाहन्याचीही यांना आठवण झाली नाही? मग त्यावेळी का उफाळुन आली नाही तुमची अपराधीपणाची भावना..?

– देशासमोर दुष्काळ ‘आ’ वासुन ऊभा आहे , मग उपोषणाच अस ढोंग करण्यापेक्षा का नाही वाटलं ह्यांना, की आपले अंध भक्त घेऊन एखाद्या डोंगराला चर खोदावी .? ह्या प्रश्नाची उत्तर देतील का हो ही लोक..

उपोषणी -उपद्व्याप कश्यासाठी...? narendra modi amit shah

नेमक काय घडल होत ते बघा .
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पावर दोन्ही सभागृहात चर्चा केली. तेव्हा ती लोकसभेत केवळ १२ तास १३ मिनिटे, तर राज्यसभेत ९ तास ३५ मिनिटे झाली. मात्र, विरोधकांनी कडाडून विरोध केल्याने, दोन्ही सभागृहाचे कामकाज तब्बल 248 तास तहकूब करण्याची नामुष्की भाजपवर आली. ( भाजप खा. अमर साबळे ह्यांची माहिती) आणि त्याचा निषेध म्हणून हे उपोषण आहे म्हणे..!!

पण ,खरतर आपल हे अपयश मान्य न करता, विरोधकांमुळे कामकाज ठप्प राहील आणि त्यामुळे आपण आत्मकलेश करणार शिवाय तहकूब काळातील मानधनही स्विकारणार नाही अस सांगत, भाजपवासीयांनी आज केलेल उपोषण म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत असच म्हणाव लागेल.कारण,बहुमतात असून देखील तुम्हाला सभागृह चालवता येत नाही? विरोधकांसोबत चर्चा घडवून आनता येत नाही? हे न पटणाऱ्या बाबी आहेत. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे ( सर्वाधिक उपस्थित, सर्वाधिक प्रश्न विचारल्याने सलग दोन वेळा संसद रत्न पटकावणारे) यांच्या म्हणण्यानुसार, भाजपच्या मंत्र्यांकड़े विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरेच नव्हती आणि त्यामुळे त्यांनी गोंधळ चालु दिला आणि सभागृह तहकूब ठेवले. आता, सत्तेत सहभागी असलेल्या मित्र पक्षातील खासदार आणि मंत्र्यांकडूनच भाजप ची अशी पोलखोल झाली. मात्र, तरीही भाजप वाल्यांना अस उपोषण करण्याच शहाणपण कुणी सुचवल हे देवालाच माहीत..

सभागृह तहकुबिच्या वेळेत ही सारी मंडळी, त्या काळात सुरु असलेल्या निवडणुकांची रण-निति आणि प्रचार यंत्रणा आखण्यात व्यस्त असावी, आणि त्यामुळे सभागृहात सामन्यांच्या प्रश्नांवर ह्यांना चर्चा वगैरे करायची होती, पण गोंधळामुळे ती झाली नाही हे सर्व म्हणन थोतांड आहे असं वाटते .शेवटी ह्या उपोषणाचं फलीत काय असेल ते माहीत नाही.पण, देशाच्या राजकीय इतिहासात विरोधकांमुळे सत्ताधारी एक दिवस उपाशी राहिले अस नमूद केल जाईल हे मात्र नक्की.मात्र, याहूनही वाईट बाब म्हणजे ,ह्या उपोषणामुळे संपूर्ण एक दिवस आपण विकासाच्या पथावर मागे पडलो आहोत हे राज्यकर्त्यांनी समजून घ्यायला हव ..किमान पुढच आंदोलन करण्या आधी तरी, वेळ- पैसा -आणि देशाची प्रतिष्ठा वाया जाणार नाही ,ह्याची काळजी घेतल्या गेली तर असे ‘उपोषणी -उपद्वव्याप’ कराण्याची यांना गरजच पडणार नाही अस वाटते..!

@ गोविंद वाकडे(पत्रकार)