जोपर्यंत मोदी सरकार हे कायदे मागे घेत नाही तोपर्यंत युवक काँग्रेस हे शेतकऱ्यांसोबत आंदोलन करतच राहील

मुंबई – केंद्र सरकारने आणलेले शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत देशव्यापी आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मशाल मार्च काढण्यात आला.

मुंबईतील सीएसएमटी पासून आझाद मैदानाजवळील शहिद स्मारकापर्यंत युवक काँग्रेसने मशाल मोर्चा काढला. या मशाल मोर्चामध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, ब्रीजकिशोर दत्त, प्रवक्ते आनंद सिंग, सरचिटणीस विश्वजीत हप्पे, इम्रान खान तसेच जिल्हाध्यक्ष पंकज मोरे आदी पदाधिकारीही उपस्थित होते.

जोपर्यंत मोदी सरकार हे कायदे मागे घेत नाही तोपर्यंत युवक काँग्रेस हे शेतकऱ्यांसोबत आंदोलन करतच राहील असे युवक काँग्रेसतर्फे स्पष्ट करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या –