आमचं सरकार येताच हे जाचक कृषी कायदे रद्द करू – राहुल गांधी

राहुल गांधी

नवी दिल्ली – नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरात आंदोलन सुरू आहेत. पंजाबमध्ये या आंदोलनाची तीव्रता जास्त अधिक आहे. याच कायद्यांचा निषेध नोंदवणार्‍या शेतकर्‍यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी रविवारी पंजाबमध्ये दाखल झाले आणि आमचं सरकार येताच हे जाचक कृषी कायदे रद्द करू अशी घोषणा केली.

दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात या कृषी कायद्यांची अंमलबजावणी करण्याची काय गरज होती? शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला हमी देतो की जेव्हा काँग्रेस सत्तेत येईल तेव्हा आम्ही हे तीन काळे कायदे रद्द करून कचर्‍याच्या डब्यात फेकून देऊ. असा घणाघात राहुल गांधी यांनी केला. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राहुल गांधी पंजाबमध्ये तीन दिवस ट्रॅक्टर रॅली करणार आहेत.

तर,”पंतप्रधानांचं म्हणणे आहे की हे विधेयक शेतकर्‍यांसाठी तयार केले गेले आहे. जर असे असेल तर सभागृहात उघडपणे चर्चा का झाली नाही. जर शेतकरी या कायद्यांमुळे खूश असेल तर तो देशभर का आंदोलन करीत आहे. पंजाबमधील प्रत्येक शेतकरी या विधेयकाला विरोध का करत आहे.”असा सवाल देखील राहुल गांधी यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या –